Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लवकरच आठपदरी होणार; MSRDC चा शासनाकडे प्रस्ताव

वाहतूक कोंडी वाढल्यानं रस्ते महामंडळाचा निर्णय

170
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग लवकरच आठपदरी होणार; MSRDC चा शासनाकडे प्रस्ताव

मुंबई – पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Expressway) सततची वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजे ‘एमएसआरडीसी’ने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता लवकरच मुंबई – पुणे महामार्ग हा आठपदरी होणार आहे.

एमएसआरडीसीने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यानं एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हा मार्ग आठ पदरी करणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास येत्या वर्षभरात कामाला सुरुवात होऊ शकेल. एकीकडे, वेगानं काम सुरू असलेला मिसिंग लिंक प्रकल्प आणि दुसरीकडे आठ लेन करण्याचा प्रस्ताव, यामुळे मुंबईहून पुण्याकडे (Mumbai-Pune Expressway) जाणाऱ्यांसह सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : ठाण्यात कडकडीत बंद; जाणून घ्या काय काय आहे बंद)

महामार्गावर सात ब्लॅक स्पॉट

पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) होणारे अपघातासंदर्भात ब्लॅक स्पॉटही शोधण्यात आले आहे. त्यात खेड शिवापूर येथील दर्गा फाटा, चेलाडी, सारोळा पूल, शिंदेवाडी, पंढरपूर फाटा, पेपर मिल आणि खंडाळा हे ब्लॅक स्पॉट आहे. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (ITMS) प्रकल्प राबण्यात येणार आहे. त्यासाठी ४३० हायटेक सीसीटीव्ही कॅमरे संपूर्ण मार्गावर इंस्टाल केले जाणार आहे. हे काम ऑक्टोबर
महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.