Toll Hike : खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांवर टोलवाढीचा भुर्दंड?

येत्या १ ऑक्टोबरपासून टोलचे दर जवळपास १२ ते १८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावाधिन आहे

150
Toll Hike : खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांवर टोलवाढीचा भुर्दंड?
Toll Hike : खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांवर टोलवाढीचा भुर्दंड?
मुंबई : आधीच खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या माथी टोलवाढीचा भुर्दंड मारण्याची तयारी सुरू आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून मुंबईच्या सीमेवरील पाचही पथकर नाक्यांवर टोलचे दर जवळपास १२ ते १८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावाधिन आहे.
मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुर्चीवर विराजमान होताच दिले होती. त्यानुसार, एकीकडे काँक्रीटचे रस्ते आकार घेत असताना, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह सायन पनवेल आणि एलबीएस रस्त्यावर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी हैराण आहे. अशात मुंबईच्या सीमेवरील टोलचे दर वाढविण्याचा प्रस्ताव समोर आल्याने त्यांच्या खिशाला झळ आणि डोक्याचा मनस्ताप वाढणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून मुंबईतील पाचही टोल नाक्यांवरील टोलचे दर वाढणार आहेत. त्यात दहिसर, एलबीएस रोड (मुलुंड), पूर्व द्रुतगती महामार्ग (मुलुंड), ऐरोली खाडी पूल आणि वाशी टोल नाक्याचा समावेश आहे. हलकी मोटार वाहने किंवा प्रवासी कारसाठी एकल मार्ग ४५ रुपये, मिनी बस ७५, ट्रक आणि बस १५०, तर मल्टी एक्सल वाहनांसाठी १९० रुपये असे नवे दर असतील.

(हेही वाचा- Maratha Reservation : ठाण्यात कडकडीत बंद; जाणून घ्या काय काय आहे बंद)

दरवाढ का?
मुंबईतील पाचही प्रवेशद्वारांवर सप्टेंबर २००२ पासून टोल आकारला जात आहे. दर तीन वर्षांनी टोल दरवाढ निश्चित होते. याआधी १ ऑक्टोबर २०२० रोजी वाढ करण्यात आली होती. त्रैवार्षिक धोरणानुसार १ ऑक्टोबर २०२३ पासून नवे दर लागू केले जाणार आहेत. हे शुल्क सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहील.
संभाव्य दरपत्रक असे….
वाहने …. सध्याचा दर …. वाढीव दर
दुचाकी, तीनचाकी, हलकी वाहने …. ४० …. ४५
मिनी बस …. ६५ …. ७५
ट्रक आणि बस …. १३० …. १५०
ट्रेलर्स, मल्टीपर्पज वाहने …. १६० …. १९०

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.