मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या जून महिन्यातही मे महिन्यासारखा असह्य उकाडा जाणवत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात जून महिन्यातील गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद (highest temperature record) झाली होती. हा विक्रम ताजा असतानाच, शुक्रवारी रात्री मुंबईत गेल्या सत्तावन्न वर्षांमधील सर्वात उष्ण रात्रीची नोंद करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी शहरातील किमान तापमान तब्बल ३०.२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या तापमानाचा हा आकडा सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. (Mumbai Heatwave Update)
(हेही वाचा – Bungee Jumping : दोरी न बांधताच महिला इन्फ्लुएन्सरने मारली बंजी जंपिंग आणि मग…)
मान्सूनचा प्रवास रखडला
सूर्यास्तानंतरही आपलं शहर थंड होत नाही आहे त्यामुळे रात्री दमट आणि उष्ण वातावरणात रहावं लागतं. हवामान तज्ज्ञांच्या मते जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर येत्या काही दिवसांत रात्रीचं तापमान हा विक्रमी पाराही ओलांडेल. त्यामुळे मान्सूनच्या गार सरींऐवजी मुंबईकरांना घामाच्या धारा सोसाव्या लागणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अनेक दिवसांपूर्वीच दाखल झाला. पण त्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास रखडला. त्यामुळे मुंबईमध्ये उकाडा वाढला आहे. मुंबईकर आता मान्सूनपूर्व उष्णता सहन करत आहेत. (Mumbai Heatwave Update)
या काळात मुंबईमध्ये साधारणपणे मान्सूनपूर्व पाऊस बरसत असतो. त्यात मान्सूनचे ढगही शहरावर असतात. यामुळे सूर्य मावळताच पारा खाली उतरतो. पण यंदा ढगाळ वातावरण आणि पावसाच्या अभावी दिवसभरातील उष्णता आणि आर्द्रता शहरावर साठून राहते. त्यात अरबी समुद्रावरून दमट वारे शहराच्या दिशेने वाहत राहिल्यामुळे उष्मा असह्य होतो. या वाऱ्यांमुळे शहरातील आर्द्रता मोठा प्रमाणात वाढते. यामुळेच रात्रीही वातावरणात उष्णता कायम राहते. आर्द्रतेमुळे जमिनीवरील उष्णता वातावरणातच अडकून राहते.
कारण काय?
अरबी समुद्राचं तापमान नेहमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे वातावरण आर्द्रता वाढते. त्या पावसाच्या अभावामुळे दिवस-रात्र मुंबईकरांना उष्मा सहन करावा लागत आहे. आणि अशा वातावरणात मुंबईकरांना ओढ लागली ती मान्सूनची.
(हेही वाचा – मुंबई ते पुणे अवघ्या ४८ मिनिटांत! रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw यांनी देशातील ७ नव्या प्रकल्पांना दिली मंजुरी )
मध्य भारतात कोरडी हवा निर्माण झाली आहे. त्यात अरबी समुद्रवार अनुकूल हवामान प्रणाली विकसित न झाल्यामुळे मान्सूनचा (Mansoon) उत्तरेकडील प्रवास रखडला आहे. येत्या काही दिवसांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पण शहराला अजून मोसमी पावसाचीच प्रतीक्षा आहे. मान्सूनला पुन्हा वेग मिळेपर्यंत मुंबईत रात्रीचं वातावरण असामन्यपणे दमट आणि उष्ण वातावरण कायम राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

