MSRTC : एसटीच्या १०३ चालकांना ‘शॉर्टकट’ पडला महागात; थांबे वगळून बस पुढे नेण्याच्या प्रकारामुळे कारवाई

29597

उड्डाणपुलाखाली बस थांबे असतात. परंतु काही चालक थेट उड्डाणपुलावरुन बस नेतात. त्यामुळे थांब्यावरील प्रवासी तासन तास बसची प्रतीक्षा करतात. एसटी बराच वेळ न आल्याने प्रवासी आगार किंवा जवळच्या बस स्थानकात, एसटीच्या (MSRTC) मदत क्रमांकावर चौकशी करतात. त्यावेळी त्यांना बस बऱ्याच वेळापूर्वी निघाल्याचे किंवा थांबा सोडून पुढे गेल्याचे समजते. त्यामुळे एसटीची वाट पहात बसलेल्या प्रवाशांचा वेळ वाया जातो. याशिवाय कुटूंबियासह आलेल्या प्रवाशांना याचा मनस्ताप होतो. शिवाय अशा घटनांमुळे एसटीचा महसुलही बुडतो.  त्यामुळे थांब्यावर न थांबवता उड्डाण पुलावरून बस नेणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे शॉर्टकट मारणाऱ्या एसटीच्या १०३ चालकांना महागात पडला आहे.

बस चालक उड्डाणपुलाखालील थांब्यावर बस न थांबवता थेट उड्डाणपुलावरुन नेतात. त्यामळे बस थांब्यावर एसटीची  (MSRTC) वाट पाहणाऱ्या प्रवाशांना वाहतुकीच्या इतर साधनांचा आधार घ्यावा लागतो. जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये अशा उड्डाणपुलावरुन थेट बस नेणाऱ्या १०३ चालकांना ‘शॉर्टकट’ महागात पडला आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत काही चालकांची वेतनवाढही रोखली आहे.

(हेही वाचा Central Railway : कुर्ला-सीएसएमटी लोकल प्रवास होणार सुसाट; पाचवी-सहावी मार्गिका होणार)

१ हजार १४ रुपये दंड वसूल 

मुंबईतील दादर, मानखुर्द, वाशी हायवेजवळील उड्डाणपुल, सानपाडा, नेरुळ, कोकण भवन, खारघर, कामोठे तसेच शीव येथील उड्डाणपुलावरुन चालक एसटी  (MSRTC) घेऊन रवाना झाल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या आहेत. हे प्रकार मुंबई, ठाण्याबरोबरच पालघर, बीड, लातूर, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर विभागांतही घडले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षात महामंडळाने थांबे उडविणाऱ्या १०३ चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ हजार १४ रुपये दंड वसूल केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.