मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; रेल्वे रूळावर लोखंडी ड्रम टाकून घातपाताचा प्रयत्न

111

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा प्रयत्न गुरूवारी मोटरमनच्या सतर्कमुळे उधळला गेला.

( हेही वाचा : महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून गणेशोत्सवात विविध उपक्रम; पर्यटकांचा उदंड प्रतिसाद )

कोरोनानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव मुंबईत सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. पाकिस्तानातून आलेल्या धमकी संदेशाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही सतर्क आहेत. यादरम्यान, भायखळा स्थानकात डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रूळावर ठेवल्याचा प्रकार उघडीस आला. गुरूवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या खोपोली जलद लोकलने भायखळा स्थानकाजवळ गती पकडली, तेव्हा रेल्वे रुळावर दगडांनी भरलेल्या लोखंडी ड्रम मोटरमन अशोक शर्मा यांना दिसला. शर्मा यांनी इमर्जन्सी ब्रेक लावला आणि या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली.

ड्रममध्ये दगड आणि खडी

भायखळा येथील आरपीएफ, ठाणे येथे कलम १५४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान मला रुळावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम दिसला. त्यानंतर मी आपत्कालीन ब्रेक लावून लोकल थांबवली. या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली. प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे अशी माहिती, मध्य रेल्वेच्या अशोक शर्मा यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.