Monsoon Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट

पालघर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

93
Monsoon Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार (Monsoon Update) पावसाने हजेरी लावली होती. या सततच्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे काही भागांतील जनजीवन देखील विस्कळीत झाले.

दरम्यान, राज्यामध्ये गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पावसाचा जोर (Monsoon Update) कमी झाला आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे हवामान विभागाने पुढचे तीन ते चार दिवस काही राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा – N D Mahanor : जेष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर कालवश)

‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून (Monsoon Update) कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज (गुरुवार, ३ ऑगस्ट) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.