Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू

मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

115
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (mumbai pune expressway) ट्रकच्या अपघात (truck accident) होऊन एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, काचेच्या सामानाची वाहतूक करणारा ट्रक घसरल्याने एक्सप्रेस वेवर सर्वत्र काचा पसरल्या. पहाटेपासून (गुरुवार, ३ ऑगस्ट) अपघातग्रस्त ट्रक आणि काचा हटवण्याचे काम सुरु असल्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प (traffic jam) झाली होती.

(हेही वाचा – N D Mahanor : जेष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर कालवश)

बुधवारी उलटला होता कंटेनर

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यामध्ये (Khandala Tunnel) मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ट्रेलर उलटला होता. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. मात्र, दोनजण जखमी झाले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. बराचवेळ ट्रेलर (Trailer) बाजूला हटवण्याचे काम सुरु असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.