Monsoon Update : पुढील दोन – तीन दिवसांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

140
Monsoon Update : पुढील दोन - तीन दिवसांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस (Monsoon Update) राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्यात १४ सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार आता मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने आपली हजेरी लावली आहे. अशातच हवामान विभागाने पुढील २४ तासांत कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने (Monsoon Update) दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, सोलापूर, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या शहरांमध्ये २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar : ‘माझ्याकडील अर्थखाते पुढे टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही’, अजित पवारांच्या विधानामुळे चर्चेला उधाण)

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात शुक्रवार (२२ सप्टेंबर) दुपारपासून पावसाने (Monsoon Update) जोरदार हजेरी लावल्याचं दिसून आलं होतं. तर कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.