Onion Traders Strike : कांदा व्यापाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच

88
Onion Traders Strike : कांदा व्यापाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच

कांदा व्यापारी आपल्या बंदावर (Onion Traders Strike) ठाम राहिल्याने शनिवार, २३ सप्टेंबर रोजी शासनाने हा बंद मोडून काढण्याचा केलेला प्रयत्न देखील निष्फळ ठरला. अशातच आता यावर सोमवारी (२५ सप्टेंबर) काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कांदा व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबर पासून सुरू केलेल्या कांदा लिलावात (Onion Traders Strike) सहभागी न होण्याचे आंदोलन हे चौथ्या दिवशी देखील कायम होते त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कांदा व्यापाऱ्यांची जी येवल्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीच्या निर्णयावरती जिल्ह्यातील सतरा बाजार समिती मधील व्यापारी असल्याने आता यावर आतापर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही.

(हेही वाचा – Asian Games 2023 : भारताचे एक पदक निश्चित; बांगलादेशचा पराभव करत भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल)

सरकारने हा संप (Onion Traders Strike) मोडून काढण्यासाठी केलेले प्रयत्न देखील निष्पळ ठरले असून यावर सोमवारी तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी तो निघण्याची शक्यता फार कमी असल्याचा दावा काही व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत काहीतरी निर्णय घेण्यात येईल अशी आशा निर्माण झाली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे भाव (Onion Traders Strike) वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.