Richest country : जाणून थक्क व्हाल! ‘हा’ देश आहे सर्वात श्रीमंत

या देशात टॅक्स खूप कमी आहे किंवा अगदी नाहीच म्हटला तरी चालेल.

144

जगातला श्रीमंत देश कोणता असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपण एका दमात अमेरिका असे उत्तर देऊ. अनेकांना अमेरिकेविषयी खास आकर्षण आहे. चीन किंवा भारताचं नावही अग्रस्थानी येऊ शकतं. कंसल्टंसी फर्म नाईट फ्रॅंकच्या रिपोर्टनुसार मोनाको हा देश श्रीमंत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आता हे नाव वाचून तुम्हाला धक्काच बसला असेल. काहींना तर प्रश्न पडला असेल की या नावाचा देश सुद्धा आहे? मोनाकोच्या टॉप १०० श्रीमंतांच्या यादी सामील होण्यासाठी तुमच्याकडे सुमारे १०२ ते १०५ कोटी रुपये असायला हवेत. महत्वाची बाब अशी की भारताची श्रीमंतांची संख्या वाढत असताना जगात ती संख्या घटत आहे.

(हेही वाचा Azad Maidan Riot : रझा अकादमीच्या दंगलीचा हिशेब अजून बाकीच!)

ऑस्ट्रेलियासारख्या देशात या यादीत समाविष्ट होण्यासाठी किमान ४५ ते ५४ कोटी रुपये असायला हवेत. या रिपोर्टनुसार भारतात श्रीमंतांच्या या यादीत सामील होण्यासाठी तुमच्याकडे केवळ १.४४ रुपये असायला हवेत. या रिपोर्टनुसार भारत या यादीत २२ व्या क्रमांकावर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोनाको हा देश या यादीत अव्वल स्थानावर कसा गेला?

तर या देशात टॅक्स खूप कमी आहे किंवा अगदी नाहीच म्हटला तरी चालेल. मोनाको देशात ४० हजार लोकसंख्या आहे. इथे ३२% लोक श्रीमंत असून १५% लोक प्रचंड श्रीमंत आहेत आणी १२% लोक तर अरबपती आहेत. हा देश खूपच लहान आहे. असा कारणामुळे हा देश श्रीमंतांच्या यादीत आला आहे. पण खरं पाहता अशा श्रीमंतीला काय अर्थ आहे? म्हणजे इथला गरीब माणूस देखील श्रीमंत म्हटला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.