Lok Sabha Election : पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 695 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

98

लोकसभा निवडणूक 2024च्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 695 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांसाठी 1586 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 3 मे 2024 होती. आलेल्या सर्व अर्जांच्या छाननीनंतर 749 अर्ज वैध ठरले आहेत.

(हेही वाचा Poonch Terrorist Attack मधील 3 संशयितांची छायाचित्रे आली समोर; पाक लष्कराचा माजी कमांडो, लष्कराचा कमांडर आणि…)

महाराष्ट्रात 512 उमेदवारी अर्ज दाखल

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात 13 लोकसभा मतदारसंघांमधून सर्वाधिक 512 उमेदवारी अर्ज आले. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशातील 14 मतदारसंघांमधून 466 अर्ज दाखल झाले. झारखंडमधील 4 छत्र लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त 69 अर्ज; तर त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशातील 35-लखनौ मतदारसंघात 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पाचव्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रति मतदारसंघ सरासरी संख्या 14 आहे.  (Lok Sabha Election)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.