Home समाजकारण Mumbai Local : मुंबईच्या लोकल मार्गावर धावणार ‘वंदे भारत’

Mumbai Local : मुंबईच्या लोकल मार्गावर धावणार ‘वंदे भारत’

दे भारत मेट्रो भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हाय-स्पीड ट्रेन - वंदे भारत एक्सप्रेसचे मिनी व्हर्जन आहे.

22

मुंबईच्या लोकल मार्गावर आता वंदे भारत धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने तशी तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. यासाठी रेल्वे बोर्डाने उपनगरीय रेल्वे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी 238 वंदे भारत मेट्रो गाड्या खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. मुंबईतील उपनगरीय ट्रेन नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या देखरेखीखाली महत्त्वाकांक्षी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III (MUTP-III) आणि 3A (MUTP-3A) चा भाग म्हणून हे रेक विकत घेतले जाणार आहेत.

या गाड्यांचे उत्पादन टेक्नॉलॉजी पार्टनरद्वारे केले जाईल आणि केंद्राच्या इंटर्नल ट्रेड व प्रमोशन इंडस्ट्री अंतर्गत मेक इन इंडिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल. या ट्रेन्सची खरेदी MRVC द्वारे केली जाईल आणि ती 35 वर्षांच्या मेंटनन्स रिक्वायरमेंट्ससह असेल. टेक्नॉलॉजी पार्टनर MUTP-III आणि 3A अंतर्गत आधीच मंजूर झालेल्या रेकच्या देखभालीसाठी दोन डेपो तयार करेल, असे अधिकाऱ्याने सांगितले. MUTP-III आणि MUTP-3A या प्रोजेक्ट्सची किंमत अनुक्रमे 10,947 कोटी रुपये आणि 33,690 कोटी रुपये आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वंदे भारत मेट्रो हा एक अत्याधुनिक रेक असेल, जो सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील शहरांना कव्हर करण्यासाठी तयार केला जाईल.

वंदे भारत मेट्रो भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हाय-स्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसचे मिनी व्हर्जन आहे. त्याची घोषणा 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती, ज्यामध्ये अत्याधुनिक रेक कमी अंतरासाठी तयार केला जाईल. या माध्यमातून 100 किलोमीटर अंतरापर्यंतची शहरं कव्हर केली जातील.

(हेही वाचा western railway windmill : रेल्वे रुळांवर उभारल्या पवनचक्क्या; पश्चिम रेल्वेचा अनोखा उपक्रम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!