PM Narendra Modi : पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांचे 64 परकीय दौरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधील G-7 शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी यांनी शांतता, स्थिरता आणि समृद्धी, अन्न, खत आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता, हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

120
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून ते आतापर्यंत 68 वेळा परराष्ट्रांच्या दौ—यावर गेले असून यात त्यांनी 64 देशांना भेटी दिल्या आहेत. यातील काही देशांना त्यांनी एकापेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सहा दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर गेले सर्वप्रथम १९ मे रोजी पंतप्रधानांनी जपानमध्ये G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली. आता ते पापुआ न्यू गिनी या देशात आहेत. यानंतर पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. पीएम मोदींच्या या भेटींची सध्या खूप चर्चा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधील G-7 शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी यांनी शांतता, स्थिरता आणि समृद्धी, अन्न, खत आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता, हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. याशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचीही येथेच भेट घेतली. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांची ही पहिलीच भेट होय. पापुआ न्यू गिनी आणि फिजीच्या पंतप्रधानांनी ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत काही मोजक्याच फिजी बाहेरच्या नेत्यांना या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय. याशिवाय पलाऊ प्रजासत्ताकानेही पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान ‘एकबाल’ पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौ—यात पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेणार आहेत.
महत्वाचे सांगायचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टर्मपेक्षा दुस—या टर्ममध्ये परकीय दौरे कमी केले आहेत. जवळपास 36 देशांचा दौरा एकदाच केला आहे. यात अर्जेंटिना, बहारीन, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फिजी, इराण, आयर्लंड, इस्रायल, इटली, जॉर्डन, केनिया, लाओस, मॉरिशस, मेक्सिको, मंगोलिया, मोझांबिक, नेदरलँड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, पॅलेस्टाईन, फिलीपिन्स, पोर्तुगाल, कतार, रवांडा, सेशेल्स, स्पेन, स्वीडन, ताजिकिस्तान, टांझानिया, तुर्की, तुर्कमेनिस्तान, युगांडा, व्हॅटिकन सिटी, व्हिएतनाम.
पंतप्रधानांनी 16 देशांना दोनवेळा भेटी दिल्या आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, इंडोनेशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि थायलंड यांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंका, ब्रिटन आणि उझबेकिस्तानला प्रत्येकी तीन वेळा भेट दिली आहे. सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीला चारवेळा भेटी दिल्या आहेत. ज्या देशांना पाचवेळा जावून आलेत त्यात चीन, नेपाळ आणि रशियाचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्स आणि जर्मनीला सहा वेळा भेट दिली आहे. तर, अमेरिका आणि जपानचे सात दौरे झाले आहेत.

PM मोदींच्या परदेश दौऱ्याचा खर्च किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च केंद्रीय गृह मंत्रालयकडून केला जातो. पंतप्रधान कार्यालयाने 2014 ते नोव्हेंबर 2022 पर्यंतची आकडेवारी सार्वजनिक केली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिली भेट भूतानला दिली होती. या प्रवासासाठी चार्टर्ड विमानाचा एकूण खर्च 2 कोटी 45 लाख 27 हजार 465 रुपये होता. यानंतर ब्राझीलच्या दौऱ्यावर चार्टर्ड विमानाचा एकूण खर्च 20 कोटी 35 लाख 48 हजार रुपये झाला. पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक परदेश दौऱ्यावर चार्टर्ड विमानांवर जवळपास तेवढीच रक्कम खर्च केली जाते. पंतप्रधान अमेरिकेला गेले तेव्हा 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2019 दरम्यान चार्टर्ड विमानावर सर्वाधिक खर्च करण्यात आला. या दौऱ्यावर चार्टर्ड विमानाची किंमत २३ कोटी २७ लाख नऊ हजार रुपये असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पीएम मोदींनी हवाई दलाच्या बोईंग बिझनेस जेट म्हणजेच बीबीजे जेटनेही अनेक परदेश दौरे केले आहेत. यावरील खर्चाचा तपशील अद्याप अद्ययावत झालेला नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.