Mhada : सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत : ‘त्या’ यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्याची शेवटची संधी

165

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या सदनिका सोडतीतील १५८ गिरणी कामगारांना १० ऑगस्ट २०२३ ते १८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत पात्रता निश्चिती करिता आवश्यक कागदपत्रे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सादर करण्यासाठी अंतिम मुदत वाढ देण्यात येत आहे. या १५८ यशस्वी गिरणी कामगार तथा वारसांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मान्यता दिल्यानुसार १५८ यशस्वी गिरणी कामगार तथा वारसांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई मंडळातर्फे सर्व सबंधित गिरणी कामगारांना या यादीचे अवलोकन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही मुदतवाढ अंतिम असणार असेल. या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये गिरणी कामगार तथा त्यांच्या वारसांनी पात्रता निश्चितीकरिता आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येईल, असे मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये सूचित करण्यात आले आहे. मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार / वारसांसाठी बॉम्बे डाईंग मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची संगणकीय सोडत १ मार्च २०२० रोजी काढण्यात आली होती.

(हेही वाचा BMC : मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे; बुधवारपासून पुन्हा मिळणार योग्य दाबाने पाणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.