Meta For Fair Elections : गुगल पाठोपाठ आता मेटाही राबवणार निवडणुकीसाठी कन्टेन्ट रणनीती

भारतीय आणि अमेरिकन निवडणुकी दरम्यान फेसबुक, इन्स्टाग्रामवर प्रसारित होणाऱ्या संदेशांवर मेटा कंपनीचं लक्ष असणार आहे. 

100
Meta For Fair Elections : गुगल पाठोपाठ आता मेटाही राबवणार निवडणुकीसाठी कन्टेन्ट रणनीती
  • ऋजुता लुकतुके

जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला भारत देश अठराव्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. आणि अशावेळी समाज माध्यमांतून चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरू नयेत यासाठी फेसबुकने (Facebook) आपली रणनीती ठरवली आहे. गुगलच्या पाठोपाठ फेसबुकनेही प्रसिद्ध होणाऱ्या माहितीची सत्यता तपासणं, माहितीची पारदर्शकता यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यायचं ठरवलं आहे. (Meta For Fair Elections)

‘जागतिक स्तरावर माहितीची सुरक्षितता आणि पारदर्शकता यासाठी आमचे ४०,००० कर्मचारी काम करत आहेत. आणि अशी यंत्रणा उभारण्यासाठी आम्ही आतापर्यंत २० अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत. फेसबुकवर प्रसारित होणाऱ्या माहितीवर देखरेखीसाठी जगभरात ७० भाषांतील १५,००० अनुभवी तंत्रज्ञ काम करत आहेत,’ असं मेटा कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. (Meta For Fair Elections)

(हेही वाचा – BMC : मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त भूषण गगराणी)

भारतीय निवडणूक आयोगाला असेल हा अधिकार 

भारतीय निवडणुकांबद्दल बोलताना मेटा कंपनी निवडणूक आयोगाबरोबर काम करत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या नैतिकतेविषयीच्या संहितेचं पालन करण्यासाठी मेटा कंपनी करारबद्ध आहे. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेडवर प्रसारित होणारी कुठलीही माहिती या निकषात बसत नसेल तर तिच्याविषयी लाल बावटा उगारण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाला असेल. (Meta For Fair Elections)

फेकन्यूज आणि फेक व्हिडिओचा मागमूस लावण्यासाठी कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याचंही ठरवलं आहे. तसंच एआय वापरून केलेले व्हिडिओ कंपनी इथून पुढे लेबल करणार आहे. म्हणजे असे व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केले असल्याचं फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्पष्टपणे सांगण्यात येईल. (Meta For Fair Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.