Lions Club of Mumbai Samruddhi: ‘लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धी’तर्फे सैनिकांना देण्यात येणार अनोखी भेट!

एअर फोर्सचे, कार निकोबारचे प्रदेशप्रमुख राजीव ढोबल यांनी कारनिकोबारला दिवाळीनिमित्त पोहोचलेल्या फराळाचे कौतुक केले

119
Lions Club of Mumbai Samruddhi: 'लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धी'तर्फे सैनिकांना देण्यात येणार अनोखी भेट!

१८ हजार फुटांवरील बर्फाळ प्रदेशात राहून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक जर डोळ्यांना गॉगल न लावता १५ ते २० मिनिटे जरी राहिले, तरी त्यांच्या दृष्टिवर परिणाम होतो. याचबरोबर अल्ट्राव्हायोलेट रेझ आणि धुक्यामुळेही डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते तसेच बर्फाळ प्रदेशात गॉगल न लावता सातत्याने काम केल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे सैनिकांना मदत म्हणून गॉगल्स देण्याचा उपक्रम लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धीतर्फे (Lions Club of Mumbai Samruddhi) राबवण्यात येणार आहे. या संस्थेतर्फे अंदमानातील १०० सैनिकांना गॉगल देण्यात येणार आहेत. याबरोबरच सीमेवर लढणाऱ्या  सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र, अशोक चक्राची प्रतिमा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून वीर सावरकर यांची मूर्तीही भेट स्वरुपात सैनिकांना दिली जाणार आहे.

लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धीतर्फे (Lions Club of Mumbai Samruddhi) अंदमान, लेह लाडख, पुंछ येथे सैनिकांना दिवाळीनिमित्त फराळ पाठवला जातो. यावर्षी कारनिकोबारला असलेल्या सैनिकांनाही फराळ पोहोचला. याचे विशेष कौतुक तेथील अधिकाऱ्यांनी केले; कारण कारनिकोबार अंदमानपासून ३५० किलोमीटर पाण्यात आहे, तर थायलंडपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. तिथे असलेल्या आदिवासींची लोकसंख्या २५ हजार आहे. भारतीय सैन्य दलातले १२०० सैनिक येथे आहेत.

(हेही वाचा – Mazgaon Tadwadi BIT Chawl : माझगाव ताडवाडीचा पुनर्विकास होणार नव्याने )

सैनिकांना कृतज्ञता पत्र देऊन सन्मान !
एअर फोर्सचे, कार निकोबारचे प्रदेशप्रमुख राजीव ढोबल यांनी कारनिकोबारला दिवाळीनिमित्त पोहोचलेल्या फराळाचे कौतुक केले. येथे पवन हाऊसद्वारेच प्रवास करता येतो. १९४५ साली जॅपनिज नागरिकांनी वसवली होती. त्यावेळी त्यांनी पाण्यासाठी ७  गोड्या पाण्याच्या विहिरी बांधल्या होत्या. याकरिता एका विशिष्ट तंत्रज्ञानाचाही वापर केला होता. समुद्रात असलेल्या ५४ चौ.किलोमीटर बेटावर पाणी खारट असणार, पण त्यांनी या विहिरीत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गोड्या पाण्याच्या विहिरी बांधल्या आहेत. (Lions Club of Mumbai Samruddhi)

‘लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धी’कडून हातभार…
आम्ही अंदमान, लडाख, लेह भागात फराळ पोहोचवतो. त्या भागातील प्रत्येक स्टेशन कमांडर, विंग कमांडर मला पत्र पाठवतात, फोन करतात. तिथे काही वेळा वादळ येतं तेव्हा सैनिकांचे खाण्याचे हाल होतात. एक कप चहा ६ सैनिक पितात. हे सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, या उद्देशाने आम्ही सैनिकांना भेटवस्तू आणि कृतज्ञता पत्र द्यायचे ठरवले आहे, अशी माहिती लायन्स क्लब ऑफ मुंबई समृद्धीचे संस्थापक अध्यक्ष लायन सुहास नार्वेकर यांनी दिली.

उपक्रमास सहकार्य
या उपक्रमात लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हेमंतराज सेठिया आणि त्यांच्या पत्नी, सीबीआयचे माजी वरिष्ठ अधिकारी कै रामकृष्ण नार्वेकर यांची मुले व सुना , दुबईच्या ऊज्जवला ठाकूर कुटुंबीय, क्लबच्या सीता राठी, संदिप रावळे आणि श्रद्धा मोरे असे विविध क्षेत्रातील १३ जणांचा या उपक्रमात सहभाग आहे. सध्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर(डिजी) अजय हवेलियाजी, माजी डिजी सुदर्शन जी, माजी डिजी डॉ. दिपक चौधरी, लायन संदिप बक्षी, संगीतकार वादक सुधीर नायक यांनीही या उपक्रमास मदत केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.