BMC : मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त भूषण गगराणी

नवी मुंबई आयुक्तपदीही कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

797
केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन वर्षांपासूनचे जे अधिकारी कायम आहेत, त्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावे, असा आदेश दिला. त्यामुळे मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इकबाल सिंग चहल यांना तात्काळ पदावरून बाजूला करण्यात आले. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर या अधिकाऱ्यांना हटवण्यात येऊ नये, अशी विनंती राज्य सरकारने आयोगाकडे केली होती. त्या विनंतीवरून आयोगाने भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा आदेश दिला. तसे पत्र आयोगाने काढले आहे.
election 4

नवी मुंबई आयुक्तपदी कोण? 

दरम्यान नवी मुंबई आयुक्तपदीही कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ठाणे महापालिका आयुक्त पदावर सौरभ राव यांची निवड करण्यात आली. निवडणूक आयोगाने तसे अधिकृतपणे परिपत्रकाद्वारे कळवले आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त भर देण्यात येऊ नये असे आयोगाने म्हटले आहे. इकबाल सिंग चहल यांची मविआचे सरकार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली होती. त्यानंतर तीन वर्षे उलटून गेली तरीही त्यांची बदली करण्यात आली नव्हती, त्यावरून सरकारवर अनेक प्रकारची टीका होत होती.मुंबई महापालिकेचे (BMC) नवीन आयुक्त भूषण गगराणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.