Fire : मालाडमधील शॉपिंग मॉलला भीषण आग; जीवितहानी नाही 

228

मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील जैन मंदिर रोडवरील ऍकमे शॉपिंग सेंटरला बुधवार, २७ डिसेंबर रोजी भीषण आग (Fire) लागली. शॉपिंग मॉलमधील पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्राला ही आग लागली असल्याचे समजते. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मॉल मधून १६ जणांची सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. शॉपिंग मॉलला लागलेली आग (Fire) ही लेव्हल 1 ची आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांसोबात मालाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी देखील पोहोचले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(हेही वाचा Ayodhya Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामाचे नेतृत्व करतोय महाराष्ट्र; जाणून घ्या कसे?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.