Dadar Dharavi Nala : दादर धारावी नाल्यावरील पुलाचा खर्च वाढला एक कोटी रुपयांनी, कारण आहे हे!

शहर विभागातील पूल तोडून नव्याने बांधकाम करण्यासाठी महापालिकेने मार्च २०२२ रोजी व्ही एन सी इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करून यासाठी विविध करांसह साडे दहा कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला होता.

1162
Dadar Dharavi Canal : दादर धारावी नाल्यावरील पुलाचा खर्च वाढला एक कोटी रुपयांनी, कारण आहे हे!
Dadar Dharavi Canal : दादर धारावी नाल्यावरील पुलाचा खर्च वाढला एक कोटी रुपयांनी, कारण आहे हे!

मुंबई शहरातील माटुंगा पश्चिम आणि दादर हिंदु कॉलनी परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दादर धारावी नाल्यावरील (Dadar Dharavi Nala) पुलाचे बांधकाम महापालिकेने मागील वर्षी महापालिकेने हाती घेतले होते. परंतु या नाल्यावरील पुल तोडून नव्याने बांधताना स्थानिक रहिवाशी आणि लोकप्रतिनिधींनी याला विरोध करत पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी केली. त्यामुळे ही पर्यायी व्यवस्था करण्यासाठी तब्बल एक कोटींचा खर्च वाढला गेला आहे. (Dadar Dharavi Nala)

शहर विभागातील पूल तोडून नव्याने बांधकाम करण्यासाठी महापालिकेने मार्च २०२२ रोजी व्ही एन सी इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करून यासाठी विविध करांसह साडे दहा कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला होता. या कामांतर्गत दादर धारावी नाल्यावर (Dadar Dharavi Nala) धोकादायक पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याचे काम केले जाणार होते. या कामाला सुरुवात करून या पुलाची पुनर्बांधणी केल्यानंतर आता संबंधित कंत्राटदाराने १ कोटी रुपयांचा खर्च वाढला असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या सर्व कामांचे कंत्राट कामाचा खर्च आता साडेअकरा कोटी रुपये एवढा झाला आहे. (Dadar Dharavi Nala)

(हेही वाचा – Ayodhya : श्रीराम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनाआधी योगी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

पुलाच्या बांधकाम स्वरुपामध्ये बदल

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दादर धारावी नाल्यावरील पूल धोकादायक असल्याने ते तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवाशांनी याला विरोध करून हे पूल पाडण्यापूर्वी लोकांना येण्या-जाण्यासाठी प्राधान्याने तात्पुरता पूल बांधण्यात यावा अशी विनंती केली. त्यानुसार तात्पुरता स्वरुपाचा पूल लोकांना येण्या-जाण्यासाठी बांधण्यात आला. (Dadar Dharavi Nala)

तसेच दिनबंधू नाल्यावरील पूल, माटुंगा पूर्व आझाद नगर पूल या ठिकाणी सेवा सुविधांचे जाळे वळण्यासाठी तात्पुरता प्लॅटफॉर्म बांधण्यात आला. या दादर धारावी नाला पुलाचे (Dadar Dharavi Nala) बांधकाम हे तात्पुरता पूल सुरु ठेवून करण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकाम स्वरुपामध्ये बदल करण्यात आला आहे, तसेच आझाद नगर येथील पूल नाल्याचा प्रवाह सुरु ठेवून करण्यासाठी बांधकाम स्वरुप बदलण्यात आले आहे. त्यामुळे बांधकामाचा खर्च एक कोटींचा खर्च वाढला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. (Dadar Dharavi Nala)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.