Maratha Reservation : कोल्हापुरातील बंदमुळे ३०० कोटींची उलाढाल ठप्प

सर्वांचा या आंदोलनाला मोठा पाठिंबा

34
Maratha Reservation : कोल्हापुरातील बंदमुळे ३०० कोटींची उलाढाल ठप्प
Maratha Reservation : कोल्हापुरातील बंदमुळे ३०० कोटींची उलाढाल ठप्प

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ (Maratha Reservation)राज्यभरात अनेक ठिकाणी कोल्हापुरात मंगळवार (५ सप्टेंबर) रोजी सकल मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंद मुळे ३०० कोटींची उलाढाल ठप्प झाली असल्याचे तेथील व्यावसायिकआणि विक्रेत्यांनी दिली आहे.
सध्या दहीहंडी गणेशोत्सव असे अनेक सण एकामागोमागएक आले आहेत. त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. त्यातच हा बंद पाळल्याने विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. औद्योगिक वसाहतींमधील बहुतांश कारखान्यांतील यंत्रांची धडधड बंद होती. समाजाने सोमवारी दसरा चौकात ‘जबाव दो’ आंदोलन करून मंगळवारी कोल्हापूर बंद पुकारला. त्याला प्रतिसाद म्हणून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली.लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार, शाहूपुरी, राजारामपुरी, महाद्वाररोड, लक्ष्मीरोड, शिवाजीरोड, बाजारगेट, लुगडी ओळ, पापाची तिकटी, महापालिका परिसर आदी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर परिसरातील वाहनांच्या शोरूम, गॅरेज, मशिन शॉप बंद होती.त्याबाबतचे फलक त्यांनी दरवाजांवर लावले होते. दुकाने, व्यापार-व्यवसाय बंद राहिल्याने नेहमीच्या गजबजलेल्या ठिकाणी वर्दळ नसल्याने शांतता होती. औषध दुकाने सुरू होती. दरम्यान, सायंकाळी पाचनंतर शहर आणि उपनगरातील काही दुकाने अर्धे शटर उघडून सुरू झाली.

(हेही वाचा : Health Benefits: दही-पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर…)

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनी पाठिंबा दिला. त्यात धान्य, कपडे, सराफ, इलेक्ट्रॉनिक साहित्य, गणेशोत्सवासाठीचे डेकोरेशन साहित्य आदी बाजारपेठांतील उलाढालीचा समावेश आहे.गुजरी परिसरातील सराफ व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून समाजाला पाठिंबा दिला. सराफ बाजार कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले.शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये काही उद्योजकांनी कारखाने बंद ठेवले. एस. टी. आणि केएमटी बस सेवा बंद राहिली. अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक उत्पादनांचे कारखाने सुरू राहिल्याचे ‘गोशिमा’चे अध्यक्ष दीपक चोरगे यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.