Zika Virus : मुंबईकरांची चिंता वाढली, झिकाचा दुसरा रुग्ण आढळला; नागरिकांना आवाहन

आजाराची चाचणी 'केईएम'मध्ये उपलब्ध

122
Zika Virus : मुंबईकरांची चिंता वाढली, झिकाचा दुसरा रुग्ण आढळला; नागरिकांना आवाहन
Zika Virus : मुंबईकरांची चिंता वाढली, झिकाचा दुसरा रुग्ण आढळला; नागरिकांना आवाहन

मुंबईतील कुर्ला येथे राहणाऱ्या एका मुलीला झिका विषाणूची लागण झाली. ही मुलगी 15 वर्षांची आहे. यापूर्वी चेंबूरमध्ये 19 जुलैला झिकाचा पहिला रुग्ण सापडला होता.

झिकाबाधीत मुलीला 20 ऑगस्टपासून ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत होता शिवाय तिला इतर दीर्घकालिन आजारही आहेत. सुरुवातीला तिने खासगी रुग्णालयात उपचार घेतले, मात्र 5 सप्टेंबरला तिला सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तपासवेळीदरम्यान झिका व्हायरसची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर पालिकेने ती राहात असलेल्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले. त्यावेळी कोणताही नवीन संशयित रुग्ण सापडला नाही तसेच तापाचा रुग्णही सापडला नाही, असे असले तरी या परिसरात एडीस डासांची वाढ होत असल्याचे आढळले. त्यामुळे येथे डास नियंत्रण उपाययोजना राबविण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : कोल्हापुरातील बंदमुळे ३०० कोटींची उलाढाल ठप्प )

आजाराची चाचणी ‘केईएम’मध्ये उपलब्ध
झिका हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तो संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. हा आजार विषाणूजन्य असला, तरी कोरोनासारखा वेगाने पसरत नाही.झिका डास डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचाही प्रसार करतात. झिका विषाणूची लागण झालेल्यांपैकी 80 टक्के व्यक्तिंना लक्षणे दिसत नाहीत. ज्यांना इतर आजार आहेत. त्यांना गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. झिका विषाणूची चाचणी सुविधा ‘केईएम’रुग्णालयात उपलब्ध आहे.

लक्षणे
ताप, त्वचेवर पुरळ येणे,डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी

नागरिकांना आवाहन
-नागरिकांनी घाबरून जाऊ नये
-डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर घट्ट झाकणांनी झाकून ठेवा
-वापरात नसलेले सर्व कंटेनर,चंक मटेरियल, टायर, नारळाचे गोळे इत्यादींची विल्हेवाट लावा.शक्यतो नष्ट करा
– घर आणि हॉटेलमध्ये शोभेच्या टाक्यांमध्ये लाव्हीव्हरी माशांचा वापर करा
– साप्ताहिक ड्राय डे साजरा करा. घरात किंवा उपहारगृहात आठवडाभर पाणी धरून ठेवणारे सर्व कंटेनर स्वच्छ धुवा आणि रिकामे करा

स्वसंरक्षणासाठी…
झिका व्हायरस डासाच्या चाव्यापासून वाचण्यासाठी घरी किंवा रुग्णालयात बेडनेटचा वापर करा. डास प्रतिबंधक औषध घरात लावा. अंग झाकलेले कपडे घाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.