Shri Krushna : जन्माष्टमीदिवशी दही-पोहे खाण्याला का आहे महत्त्व?

24

श्री कृष्ण जन्मोत्सव अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. कृष्णभक्तीत तल्लीन होणाचा, कृष्णांची भजन किर्तन ऐकणाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरते. भगवान कृष्णांचा जन्न मध्यरात्री झाल्याने दोन दिवस त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. कृष्णांच्या मंदिरात रात्र १२ ला पाळणा गायला जातो. जग कल्याणासाठी अवतारलेल्या कृष्णांच्या जन्माचा जल्लोष केला जातो.

दुसऱ्यादिवशी दहीहंडीचे नियोजन असते. नंदलाल कृष्णांना लहानपणीपासून दही, लोणी खाण्याची आवड होती. बरं, ते स्वत: गावप्रमुखाचे पुत्र होते तरी घरी असलेले यशोदामातेने बनवलेले आयते लोणी त्यांना कमीच आवडायचं. त्यामुळे सवंगड्यांची गट्टी जमवून त्यांनी गोपिकांच्या घरचेही लोणी पळवले. यासाठी एकमेकांच्या खांद्यावर चढून ते दह्याची हंडी फोडायचे.

श्रीकृष्णांना काय आवडतं असा विचार केला तर लोणी आणि दही यांचेच नाव सुचते. पण, तुम्हाला माहितीय का बाळकृष्णांना दहीकालाही खूप आवडतो. दहीकाला का बनवला जातो, त्याची कथा आणि तो कसा बनवायचा याची थोडक्यात माहिती घेऊयात.

रूक्मिणी माता श्रीकृष्णांवर रूसून जेव्हा पंढरपुराजवळच्या दिंडीरीवनात आल्या. तेव्हा त्यांना मनवण्यासाठी श्रीकृष्णांनीही पंढरपुराची वाट धरली. येताना ते गोपाळ, गोमाता यांचा लवाजमा सोबत घेऊनच आले होते. जेव्हा श्रीकृष्णांनी माता रूक्मिणींना मनवले आणि त्या प्रसन्न झाल्या.

(हेही वाचा Bharat : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरही Bharat लिहा; वीरेंद्र सेहवागची बीसीसीआयकडे मागणी )

तेव्हा भगवंतानी उंच पर्वतावर मोठ्या उत्सवाचे आयोजन केले होते. त्यात सर्व सखे भक्त आपापली शिदोरी घेऊन आले आणि याच, एकत्र जेवणाच्या समारंभाला ‘काला’ म्हणतात. “गोपाल काला” हा उत्सव पंरपुरात वर्षातून दोनदा साजरा केला जातो. प्रथम जून-जुलै महिन्यातून आषाढी पौर्णिमेला आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील कार्तिकी पौर्णिमेला. तनमनाने सारे भाविक एकत्र होतात. विठ्ठलनामाचा, गोपाळकृष्णाचा जयघोष करतात. दिंड्या पालख्या घेऊन वारकरी येथे एकत्र येतात. कीर्तने करतात. काला देतात, घेतात, खातात.

सारे उत्सवात समरस होऊन जातात. आजही जेव्हा येथे कथेचे वाचन केले जाते तेव्हा पोहे आणि दही एकत्र करून एकमेकांवर टाकतात. गोपाळपुरात वेगवेगळी भक्तमंडळी, वेगवेगळ्या ठिकाणी, आषाढी आणि कार्तिक महिन्यात काल्याचा उत्सव साजरा करतात. दही- पोह्यांनी भरलेले माठ वृक्षांना लटकवून दहीहंडीसारखेच फोडतात.

देवही मत्सांच्या रूपात खातात दही-काला

पंढरपुरात असलेली गोपाळपूरची टेकडी हाच गोवर्धन पर्वत असून तो चंद्रभागेच्या काठावर आहे. गोपाळपूर, विष्णुपद हे पंढरपूर क्षेत्राचे अविभाज्य घटक असून यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळ आहेत. विष्णुपदी श्री गोपाळकृष्ण गोपाळांसह नित्य भोजन करीत असतात. गोपाळपुरात गाई चरून पाणी पाजण्याकरिता चंद्रभागेवर आल्यानंतर गोपाळ आपापल्या शिदोऱ्या काढून भोजनाचा आनंद घेत असतात. त्यावेळी आपणास त्यातील उष्टा भाग मिळावा, म्हणून कित्येक देव मत्स्यांची रूपे धारण करून श्री चंद्रभागेच्या पात्रात काठावर पडलेले उच्छिष्ट भक्षण करतात, असा उल्लेखही पुराणांमध्ये आढळतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.