Maharashtra Weather Update : कोकण, विदर्भात आज ‘यलो अलर्ट’; मुंबई-पुण्यात पावसाचा जोर कसा राहणार?

IMD च्या प्रादेशिक अंदाजानुसार, कोकणातील काही भाग तसेच विदर्भात आज स्थानिक पातळीवर मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात

149
Maharashtra Weather Update
तुमच्या भागांत काय असेल पावसाची स्थिती? जाणून घ्या

Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवार (३ ऑगस्ट २०२६) साठी कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून, पुणे शहर आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कोकण आणि विदर्भात यलो अलर्ट

IMD च्या प्रादेशिक अंदाजानुसार, कोकणातील काही भाग तसेच विदर्भात आज स्थानिक पातळीवर मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात. अनेक भागांत पावसासोबत जोराचे वारे वाहणार असल्याचा देखील वर्तवण्यात आला असल्यामुळे, या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यांतील काही भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)

हेही वाचा: Horoscope Today 3 August 2026 : आज ‘या’ राशींना मिळू शकतो मोठा लाभ; तुमची रास यामध्ये आहे का?

मुंबईतील पावसाचा अंदाज

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगारांमध्ये सकाळपासूनच पावसचा जोर कायम असून, आज दिवसभरात अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही भागांत अल्पकाळ जोरदार सरींची शक्यता असली तरी, मागील काही दिवसांप्रमाणे व्यापक अतिवृष्टीचा अंदाज नाही. मात्र, सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे, असे IMD ने म्हटले आहे.

पुण्यात काय स्थिती?

पुणे शहरात ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. अलीकडील पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, पुढील दोन दिवसही अधूनमधून पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update)

हेही वाचा: Crime : डोंबिवलीत काळे कपडे, चेहऱ्यावर मास्क लावून घरफोडीचा प्रयत्न

राज्यातील इतर भागांत पावसाचा जोर?

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत तुरळक स्वरूपाच्या सरी पडू शकतात. विदर्भात मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाच्या सूचना लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाच्या पुढील पाच दिवसांसाठीच्या अंदाजानुसार, राज्यातील कमाल तापमानात पुढील काही दिवसांत सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. किमान तापमानात मात्र विशेष बदल अपेक्षित नाही. पावसाची तीव्रता कमी-जास्त होत राहणार असली तरी मान्सूनची सक्रियता राज्यात कायम राहण्याचा अंदाज आहे.

हेही पाहा:

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.