Maharashtra : राज्याची ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक झेप; सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ‘फास्ट ट्रॅक यंत्रणा’ उभारण्याची घोषणा

137
उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे दृश्य सह्याद्री पर्वतरांगेत
Maharashtra : राज्याची ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक झेप; सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 'फास्ट ट्रॅक यंत्रणा' उभारण्याची घोषणा
  • प्रतिनिधी 

महाराष्ट्र आता ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेणार आहे ! राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी अनुकूल परिस्थितीचा फायदा घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “फास्ट ट्रॅक यंत्रणा” उभारण्याची घोषणा केली आहे. या यंत्रणेअंतर्गत अशा प्रकल्पांना लागणारे सर्व परवाने – जलवापर, पर्यावरणीय मंजुरी, व इतर तांत्रिक परवानग्या जलदगतीने मिळणार आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी पंचमौली – देवळीपाडा (धुळे/नंदुरबार) उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ८ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. हरियाणास्थित जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्यात हा करार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. (Maharashtra)

(हेही वाचा – कोणत्या देशाची Air Defense System सर्वात मजबूत? भारत आणि रशियाचे ‘आयर्न डोम्स’ अमेरिकेच्या पॅक-३ ला देऊ शकतात का टक्कर?)

मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील ऊर्जा ग्रीड स्थिर ठेवण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्प म्हणजे एक नवा पर्याय आहे. महाराष्ट्राने १ लाख मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या माध्यमातून केवळ राज्यच नव्हे तर राष्ट्रीय वीज ग्रीडही अधिक स्थिर होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र सौरऊर्जेच्या क्षेत्रातही नवा इतिहास रचत आहे. आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प राज्यात उभारला जात असून त्यातून तब्बल १६ गिगावॅट सौरऊर्जा निर्माण होईल. शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सौरऊर्जेवर वळविल्याने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. (Maharashtra)

(हेही वाचा – Dombivli : सणानिमित्त लावलेल्या कमानीमुळे ट्रक अडकून वाहतूक कोंडी; व्हिडीओ होतोय व्हायरल)

कार्यक्रमात अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले की, आतापर्यंत ५० उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी करार झाले असून, सर्व प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार सज्ज आहे. या ५१ प्रकल्पांमुळे ७०,३१५ मेगावॅट वीज, ३.८३ लाख कोटींची गुंतवणूक, आणि तब्बल १.१३ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. पंचमौली – देवळीपाडा प्रकल्पाच्याच उदाहरणातून हे स्पष्ट होते की, या प्रकल्पाची १५०० मे. वॅ. क्षमता, सुमारे २५०० रोजगार, आणि सरकारला पाण्याच्या वापरातून २,८९० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळणार आहे. राज्यातील या नव्या “फास्ट ट्रॅक” ऊर्जा योजनेमुळे महाराष्ट्र देशातील अक्षय ऊर्जेचा नेता बनणार, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. (Maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.