Raj Thackeray यांनाही ‘व्होट जिहाद’चं दुखणं जडलंय; मंत्री आशिष शेलारांचा खोचक टोला

124
Raj Thackeray यांच्याकडून 'त्या' वृत्ताचे खंडन; म्हणाले...
  • प्रतिनिधी 

राज्याच्या राजकारणात सोमवारी भाजपाने स्फोटक बॉम्ब टाकला ! मतदार याद्यांतील दुबार नावे, मुस्लिम मतदारांची आकडेवारी आणि विरोधकांचा दुहेरी चेहरा यावर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुराव्यानिशी हल्लाबोल केला. मनसे आणि महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी “मतचोरीच्या” आरोपांचा मोर्चा काढला होता. परंतु, सोमवारी मंत्री शेलारांनी पलटवार करत “दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे आणि मविआचे दुर्लक्ष” असल्याचा दावा करत विरोधकांची “असत्यकथा” फोडून काढली. “राज ठाकरे यांना केवळ हिंदू आणि मराठी मतदारांच्या नोंदींतील घोळ दिसतात, पण मुस्लिम दुबार मतदार दिसत नाहीत. त्यांनाही ‘व्होट जिहाद’चं दुखणं जडलं आहे !” असा मंत्री शेलारांनी घणाघात केला. (Raj Thackeray)

भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री शेलारांसोबत (Ashish Shelar) भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. मंत्री शेलार म्हणाले, “भाजपा कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही. पण मविआ आणि आता नवा भिडू राज ठाकरे हे समाजांमध्ये फूट पाडत आहेत. आम्ही त्यांच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करू.” मंत्री शेलारांनी पुढे ८ प्रकारांतील दुबार नावे सादर करत सांगितले की, हे फक्त निवडणुकीतील ‘घोळ’ नाही, तर महाविकास आघाडीचा सुनियोजित व्होट जिहाद आहे. “मतचोरीचा खोटा गळा काढून खरा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Tamil Nadu : एमबीएच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह)

यावेळी मंत्री शेलारांनी (Ashish Shelar)  महत्त्वाचा आकडा जाहीर केला. केवळ ३१ विधानसभा मतदारसंघांच्या विश्लेषणात २,२५,७९१ मुस्लीम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आढळले असून, संपूर्ण २८८ मतदार संघांमध्ये ही संख्या १६ लाख ८४ हजारांपर्यंत जाऊ शकते. “यात मविआ समर्थकांचा समावेशच नाही,” असे त्यांनी अधोरेखित केले. मंत्री शेलारांनी विरोधकांना थेट आव्हान दिलं की, “रोहित पवार, नाना पटोले, वरुण सरदेसाई, जितेंद्र आव्हाड, अमित देशमुख यांच्यासारख्या नेत्यांच्या मतदारसंघात हजारो दुबार मुस्लिम मते आहेत. मग त्यांच्या विजयामागे ही मतेच कारणीभूत आहेत का ?” कर्जत-जामखेड, लातूर, माळशिरस, धारावी, मुंबादेवी, मालाड पश्चिम आदी मतदारसंघांत हजारो दुबार मतदार असल्याचा दावा करत मंत्री शेलार म्हणाले, “एकाच फोटोवरून नावे बदलण्यात आली, काही ठिकाणी तर लिंगही बदललं ! हा प्रकार ‘चोर मचाये शोर’सारखा आहे.” (Raj Thackeray)

कर्जत-जामखेडमधील उदाहरणे देताना त्यांनी नावे स्पष्ट केली “शबनम शेख, रूबिना शेख, साजिद शेख, आयशा आतार, रेयान कुरेशी, अफसाना पठाण यांची नावे दोन ठिकाणी दिसतात. हे निव्वळ योगायोग नाही.” बांद्रे पूर्वमधील “मुमताज बानो अन्सारी”चे नाव दोन ठिकाणी असल्याचा दाखला देत मंत्री शेलार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीनंतर हे नाव अचानक डिलीट झाले. मग प्रश्न असा की, या यादींचं सर्व्हर मातोश्रीवर आहे का ?” मंत्री शेलारांचा (Ashish Shelar) शेवटचा प्रहार नेहमीसारखाच धारदार होता. “दुबार मतदार फोडून टाकण्याची भाषा करताना पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का ? महाविकास आघाडीचा हा दुहेरी चेहरा आता राज्याच्या जनतेने ओळखलाच पाहिजे !” (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.