राज्यातील तब्बल इतके शिक्षक वेतनापासून वंचित, दिला तीव्र आंदोलनाचा इशारा!

96

राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे डिसेंबर महिन्यातील वेतन जानेवारीचा अर्धा महिना संपला तरी झालेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल 3 हजार 361 शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत जर वेतन झाले नाही, तर 25 जानेवारीपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट

राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांना डिसेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुधीर तांबे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांचे वेतन काढण्याबाबत होत असलेल्या विलंबाची तक्रार केली. शिक्षकांच्या तक्रारीची दखल घेत, शिक्षण मंत्र्यांनी सचिवांना तत्काळ वेतन काढण्याबाबत सूचना केल्या.

( हेही वाचा :गड-किल्ल्यांच्या इस्लामीकरणाविरुद्ध भाजपने थोपटले दंड )

..तर राज्यभर आंदोलन करु

यावेळी शिक्षकांनी सेवासंरक्षण हा विषय लालफीतीत अडकल्यासंदर्भातील विचारणाही यावेळी शिक्षकांकडून करण्यात आली असता, फाइल तयार असून, लवकरच निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. मात्र सेवा संरक्षणाचा निर्णय तत्काळ न झाल्यास 25 जानेवारीपासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी यावेळी शिक्षणमंत्र्यांना दिला. यावेळी कृती समितीचे संजय डावरे, धनाजी साळुंखे, पुंडलीक रहाटे, गुलाब पाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.