बापरे… कोरोनाची लागण झालेल्यांना पुन्हा गाठतोय कोरोना!

88

राज्यात कोरोनाचा कहर अद्याप सुरूच आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधितांची नोंद होताना दिसतेय. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळल्यानंतर मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येणार की काय अशी परिस्थिती होती. आता वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची लाट ओसरण्यास सुरुवात झाली असून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सहा हजारापर्यंत खाली आला आहे. असे असले तरी एकदा कोरोना झाला म्हणून पुन्हा कोरोना होणार नाही, अशा भ्रमात नागरिकांनी राहता कामा नये, कारण समोर आलेल्या माहितीनुसार, दुसऱ्यांदा कोरोना पॅझिटिव्ह होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय.

कोरोना झाल्यानंतरही नागरिक पॉझिटिव्ह

मुंबईत ब्रेक थ्रू संसर्गात म्हणजेच दोन्ही कोरोना लसीकरणानंतर कोरोनाची लागण होण्यात वाढ झाली आहे. मुंबई शहर उपनगरात कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या १८ हजार ३५६ जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे, तर दोन्ही डोस घेतलेल्या ४० हजार ५३६ जणांना कोरोना झाला आहे. या आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, कोरोना लसीकरणाचे दोन डोस होऊन आणि पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह होताना दिसताय.

(हेही वाचा – US Airport 5G: एअर इंडियासह अनेक फ्लाईट्स आज रद्द, काय आहे नेमकं कारण)

लसीमुळे कोरोना संसर्गाची तीव्रता कमी

कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर संसर्ग होणार नाही, याबद्दल कुठलेच ठोस संशोधन जागतिक पातळीवर झालेले नाही. शिवाय, लसीकरणानंतर कोरोना होणार नाही, याला वैज्ञानिक आधार नाही. या लसीमुळे संसर्गाची तीव्रता कमी होते, आजार सौम्य होतो. रुग्णालयात दाखल होण्याची वेळ न येणे. गंभीर आजार न होणे, यासाठी कोरोना लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरणानंतरही कोरोना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. राज्याच्या कोरोना टास्क फोर्स सदस्य, डॉ. अविनाश सुपे यांनी असे सांगितले की, लसीकरणानंतरही काहींना कोरोना होत आहे. परंतु हे प्रमाण कमी आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोरोना लसीकऱण गरजेचे आहे. लसीकरण झालेल्या ०.०३-०.०४ टक्के लोकांनाच कोरोना होत आहे. लसीमुळे कोरोनाचे गंभीर परिणाम जाणवत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.