Maharashtra Din : महापालिकेने संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालन बांधले, आम्ही नाही पाहिले! बाळासाहेबांनी उद्घाटन केलेले स्मृती दालन दुर्लक्षित…

पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाच्या तीन मजल्यांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा संक्षिप्त इतिहास मांडण्यात आला आहे.

182
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनातील 3D मेश शो खर्च वाढला
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनातील 3D मेश शो खर्च वाढला

विशेष प्रतिनिधी – सचिन धानजी

संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा Maharashtra Din आणि हुतात्म्यांचे बलिदान चिरंतन स्मरणात रहावे म्हणून आणि नवीन पिढीलाही हा इतिहास माहिती व्हावा, यासाठी मुंबई महापालिकेने संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरील वास्तूत केली. तब्बल १३ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या  स्मृती दालनात आजही लोकांची पाठ असून महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक या दालनात जास्तीत जास्त पर्यटकांनी यावे यासाठी प्रयत्न करत नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या संकल्पनेतून उभारलेले हे स्मृती दालन हे दुर्लक्षितच आहे. त्यामुळे ही वास्तू केवळ महापालिकेची एक वास्तू अशीच एक समज लोकांची झाली आहे.

बाळासाहेबांनी केले होते उद्घाटन..

मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाचे ३० एप्रिल २०१० रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालनाच्या तीन मजल्यांवर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा Maharashtra Din संक्षिप्त इतिहास मांडण्यात आला आहे.

सन २०१० ला हे स्मृती दालन सुरू झाल्यानंतर कोविड पासून पूर्ण पणे बंद आहे. कोविड नंतर हे सुरू करण्यात आले असले तरी लोकांना मात्र याची अद्याप कल्पना देण्यात आली ना पर्यटकांना या स्मृती दालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

(हेही वाचा दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश हत्यांचा तपास म्हणजे विनोद; ‘द रॅशनलिस्ट मडर्स’चे लेखक डॉ. अमित थडानी)

या स्मृती दलानाची मागील वर्षी रंगरंगोटी करण्यात आली, तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली.पण या वास्तूत  स्मृती दालन असून सर्वसामान्य जनता तथा पर्यटक याठिकाणी भेट देऊ शकतात याबाबत कुठेही जनजागृती करण्यात येत नाही. या वास्तूच्या परिसराचा वापर तरण तलावात पोहायला येणाऱ्यांची वाहने उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या वास्तूचा परिसर केवळ वाहनतळ म्हणूनच वापर केला जात आहे.

या स्मृती दालनाचा वापर महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात होता. पण आता हे स्मृती दालनमहापालिकेच्या म्हणण्यानुसार खुले असले तरी पर्यटक आणि जनतेला मात्र याची कल्पनाच नाही

तळ घरात हे पाहू शकता…

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतलेल्या नेत्यांची तैलचित्रे, महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी व माती असलेले कलश, भारतमातेची शिल्पाकृती, महाराष्ट्रातील लोककलेची शिल्पाकृती इत्यादी बाबी दालनाच्या तळघरात मांडण्यात आल्या आहेत.

संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालन
संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालन

तळ मजल्यावर काय पाहू शकता…

तळमजल्यावर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा Maharashtra Din इतिहास डोळ्यापुढे उभी करणारी छायाचित्रे, शिल्पचित्रे व माहिती फलक मांडण्यात आले आहेत.

संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालन
संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालन

पहिल्या मजल्यावर हे पाहू शकता…

पहिल्या मजल्यावर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे, लेण्यांचे देवस्थानांचे व पर्यटनस्थळांचे विहंगम दृश्य दर्शविणारी शिल्पे मांडण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्रातील लोककला, संस्कृती व प्राचीन शिल्पांचे नमूनेही याठिकाणी आहेत.

(हेही वाचा BMC School : शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मुलांना २७ शालेय वस्तू)

काय आहे इतिहास?

साधारणपणे वर्ष १९५६ पासून संयुक्त महाराष्ट्र लढ्याची Maharashtra Din सर्वार्थाने सुरुवात झाली. यामध्ये शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्यासह सामान्य जनतेनेही सहभाग घेतला. मुंबईतील जनतेचे व गिरणी कामागारांचे या लढ्यात मोठे योगदान होते. गिरगांव व गिरणगावात रणकंदन झाले होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा देण्यासाठी लाखो मराठी स्त्री-पुरुषांनी व नेत्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये झुंज दिली.

संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालन हे मंगळवार ते रविवार यादरम्यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असते. दर सोमवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी हे संग्रहालय बंद असते महापालिकेच्या वतीने  सांगण्यात येते.

वस्तुसंग्रहालयाचा पत्ताः

संयुक्त महाराष्ट्र स्मृतीदालन, महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक म. न. पा. जलतरण तलावाशेजारी, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८

संग्रहालयाबाबत अधिक माहितीसाठी ०२२-२४४५-२०६२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.