Madhuri Elephant : नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीणीच्या पुनरागमनाच्या तयारीला वेग

78
Madhuri the elephant in a natural setting
Madhuri Elephant : नांदणी मठातील 'माधुरी' हत्तीणीच्या पुनरागमनाच्या तयारीला वेग

Madhuri Elephant          जामनगरच्या वनतारा मध्ये नेण्यात आलेली नांदणी मठातील ‘माधुरी’ उर्फ महादेवी हत्तीण येत्या महिन्याभरात परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वनताराची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे. प्रस्तावित पुनर्वसन केंद्राच्या जागेची पाहणी या टीमने सुरू केली आहे. शिरोळ तालुक्या तील नांदणी येथील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीणीच्या परतीच्या हालचालींना वेग आला आहे. (Madhuri Elephant)

(हेही वाचा – Dombivli : ठाकुर्ली पूल प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा महासभेत)

गुजरातमधील वनतारा संस्थेचे पथक सोमवारी नांदणीत दाखल झाले. पथकाने माधुरीसाठी उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. यावेळी नांदणी मठातील काही पदाधिकारी उपस्थित होते. माधुरीच्या पुनर्वसनासह सुरक्षित पुनरागमनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. माधुरी हत्तीणीला २८ जुलै २०२५ रोजी वनतारा येथे नेण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. लाखो नागरिकांनी तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला होता. (Madhuri Elephant)

(हेही वाचा – Marathi vs Jain : मुंबईत ‘पांढऱ्या पट्ट्या’वरून नवा वाद; मनसैनिकांवर गुन्हा, तर मनसेचा प्रशासनाला सवाल)

न्यायालयीन लढाईही देण्यात आली. नांदणी मठातच माधुरी हत्तीणीला ठेवावे यासाठी नांदणीमध्येआवश्यक पुनवर्सन केंद्र उभा करावे याबाबत निर्णय झाले. मठ आणि ग्रामस्थांनी पुनवर्सन केंद्रांसाठी जागा देण्याची तयारी दर्शवली तर वनतारा संस्थेने पुनवर्सन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली. यानुसार आता पुनवर्सन केंद्र उभारण्याची पहाणी करण्यासाठी वनताराचे पथक नांदणी येथे आले आहे. त्यामुळे पुनवर्सन केंद्र उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे. पुनवर्सन केंद्र पूर्ण होताच माधुरी हत्तीण मठात येणार असल्याने याबाबत समाधान व्यक्त होत आहे. (Madhuri Elephant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.