LPG Cylinder price: एलपीजी गॅस सिलेंडर १९८ रुपयांनी स्वस्त

94

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरचे दर 198 रुपयांनी कमी झाले आहेत. इंडियन ऑइलने 1 जुलै रोजी जाहीर केलेल्या किमतीनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर ( LPG Commercial Cylinder Price) 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

दिल्लीत 30 जूनपर्यंत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2 हजार 219 रुपयांच्या तुलनेत आता हा सिलेंडर 2 हजार 140 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2 हजार 171.50 रुपयांवरुन 1 हजार 981 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 2 हजार 373 रुपयांवरुन 2 हजार 186 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तेल कंपन्यापकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1003 रुपयांना मिळत आहे.

( हेही वाचा: शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे याला प्राधान्य देण्यात येईल – फणसाळकर)

200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी

जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.