Love Jihad : धर्मांध मुसलमानाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू तरुणीवर केले अत्याचार, धर्मांतर करायला भाग पाडले 

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणाने या मुलीला अनिकेत म्हणून स्वतःची ओळख करुन दिली. त्याने या मुलीशी ओळख वाढवली, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पीडित मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले.

147

धर्मांध मुसलमानाने स्वतःला हिंदू असल्याचे भासवले आणि हिंदू तरुणीला फसवले, तिचे जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले, तसेच त्याच्या वडिलांशी सेक्स करायला लावले, असा गंभीर आरोप पीडित हिंदू तरुणीने केला. २४ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अबिद नावाच्या तरुणाला अटक केली. त्याने या पीडित तरुणीला स्वतःची ओळख अनिकेत अशी करुन दिली होती.

तरुणीने काय तक्रार दिली?

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणाने या मुलीला अनिकेत म्हणून स्वतःची ओळख करुन दिली. त्याने या मुलीशी ओळख वाढवली, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पीडित मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्याने या मुलीला लग्नाचे वचन दिले होते.  त्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करु लागला. तुझे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी तो तिला देत होता. ही घटना उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये घडली आहे. मला तरुणाने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि वडिलांशी शरीर संबंध ठेवायला भाग पाडले. एवढेच नाही तर अबिदने मला जबरदस्तीने धर्मांतरही करायला लावले असाही आरोप या पीडित तरुणीने केला आहे. जेव्हा या सगळ्याबाबत मी अबिदकडे तक्रार केली तेव्हा त्याने मला मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्या कुटुंबाने मला कोंडून ठेवले होते. मी कशीबशी स्वतःची सुटका करुन पळाले असे या पीडितेने तक्रारीत म्हटले. बरेलीचे पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी विषयीची माहिती देताना सांगितले की आम्ही पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन बळजबरीने धर्म परिवर्तनाची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून अबिदला अटक केली आहे.

(हेही वाचा Shivrajyabhishek : शिवप्रेमींनी सिंहगडावर अनुभवला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सुवर्णक्षण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.