Chhatrapati Shivaji Maharaj : मुंबईत भरवले शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रत्येक शस्त्रांचा काही ना काही इतिहास आहे. तो इतिहास लोकांपर्यंत पोहचला गेला पाहिजे आणि जपला गेला पाहिजे. या उद्देशाने या शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यास सुरुवात झाली.

139

मागील १८ वर्षे संपूर्ण भारतभर फिरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात असलेल्या शस्त्रांचे संशोधन शिवप्रेमी निलेश सकट यांनी केले. संशोधनात त्यांना मिळालेल्या शस्त्रांचे त्यांनी नीट जतन केले. संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात सारख्या अनेक राज्यांत जाऊन ७०० हुन अधिक प्रदर्शन त्यांनी भरवले. यंदा शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने सकट यांनी हे प्रदर्शन मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे भरवले.

shivaji1

या प्रदर्शनाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराजांच्या काळातील असलेल्या प्रत्येक शस्त्रांचा काही ना काही इतिहास आहे. तो इतिहास लोकांपर्यंत पोहचला गेला पाहिजे आणि जपला गेला पाहिजे. या उद्देशाने शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहाय्याने हे शस्त्र प्रदर्शन मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे भरवण्यात आले. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला महाराजांचे युध्द शस्त्र काय होते, हे समाजावुन त्याचे संरक्षण केले गेले पाहिजे. जवळपास 400- 425 शस्त्रे ही या प्रदर्शनात मांडण्यात आलेली आहेत. सर्वांनी इथे भेट देऊन आपला जाज्वल्य इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन निलेश अरुण सकट यांनी केले.

shivaji3

(हेही वाचा Love Jihad : धर्मांध मुसलमानाने हिंदू असल्याचे भासवून हिंदू तरुणीवर केले अत्याचार, धर्मांतर करायला भाग पाडले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.