Organ Donation : नागरिक जागृत, सलग दोन दिवसांत १२ अवयवदान

अवयवदानामुळे मुंबईतील अवयवदानाची संख्या २८ पर्यंत पोहोचली आहे

117
Organ Donation : नागरिक जागृत, सलग दोन दिवसांत १२ अवयवदान
Organ Donation : नागरिक जागृत, सलग दोन दिवसांत १२ अवयवदान

गेल्या विकेंडला शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस अवयवदान झाल्याची माहिती मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समितीने (झेडटीसीसी) दिली. या अवयवदानामुळे मुंबईतील अवयवदानाची संख्या २८ पर्यंत पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत केवळ २८ अवयवदान झाल्याने दरवर्षागणिक चाळीशीपार जाणारी अवयवदानाची संख्या यंदाही कमी राहील की काय अशी भीती अवयवदान चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

शनिवारची घटना

वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय तरुणाला काही कारणास्तव दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यावर उपचार केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मेंदूमृत घोषित केले. रुग्ण मेंदूमृत अवस्थेत गेल्यानंतर कालांतराने मृत पावतो. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या शरीरातून अवयवदान करता येतात. डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या मृत्यूपश्चात कुटुंबीयांनी हृदय, यकृत, दोन मूत्रपिंड आणि डोळे असे सहा अवयव दान केले. अवयवदान मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समितीच्या नियमानुसार केले गेले.

(हेही वाचा – Wheat : तांदळानंतर आता गव्हाची दरवाढ; किंमती सहा महिन्यांच्या उच्चांकावर)

रविवारची घटना

४३ वर्षाचा इसम दक्षिण मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला होता. रुग्ण नेमक्या कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल झाला ही माहिती मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समितीने दिली नाही. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मेंदू मृत घोषित केले. रुग्णाच्या कुटुंबीयांनी अवयवदान चळवळीला मोठा पाठींबा दर्शवला.

रुग्णाच्या मृत्यूपश्चात हृदय, यकृत, फुफ्फुस, दोन मूत्रपिंडे आणि दोन डोळे कुटुंबियांनी दान केले. अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार झाल्याचे समन्वयकांनी सांगितले. दरम्यान, मुंबईकरांनी जास्तीत जास्त अवयवदान चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.