Krida Mahakumbh:२०२३-२४ : खाऊ आणि प्रसिध्दीवरच सुमारे दीड कोटींचा खर्च

क्रीडा महाकुंभसाठी महापालिकेच्या तिजोरीवर भार

799
Krida Mahakumbh:२०२३-२४ : खाऊ आणि प्रसिध्दीवरच सुमारे दीड कोटींचा खर्च
Krida Mahakumbh:२०२३-२४ : खाऊ आणि प्रसिध्दीवरच सुमारे दीड कोटींचा खर्च

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ (Krida Mahakumbh:२०२३-२४) चा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांच्या मुख्य उपस्थितीत समारोप बुधवारी करण्यात आला. क्रीडा महाकुंभातून एक प्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पारंपरिक खेळांना  उजाळा मिळावा म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Traditional Sports) महाकुंभ :२०२३-२४ चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका आणि क्रीडा भारतीकडून संयुक्तपणे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ (Krida Mahakumbh:२०२३-२४) याकरता महापालिकेच्या (Municipal Corporation) तिजोरीतून खर्च करण्यात आला आला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी, पंच व पाहुण्यांच्या खाऊ खरेदीकरता ६६ लाख रुपये आणि हा महाकुंभ तसेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम जीवन चरित्र या कार्यक्रमाच्या प्रसिध्दीसाठी ८९ लाख  रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ प्रसिध्दी आणि खाऊवरच सुमारे दीड कोटींचा खर्च झाला असून अन्य प्रकारचा खर्चही महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Krida Mahakumbh:२०२३-२४)

(हेही वाचा- Mumbai Nhava Sheva Port: पाकिस्तानात जाणारे चिनी जहाज भारताने रोखले; बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांशी संबंधित यंत्रसामग्री, शस्त्रे तपासानंतर जप्त)

राज्यातील जुन्या पारंपारिक खेळांना प्रोत्साहन मिळावे व लुप्त झालेले खेळ समाजात पुन्हा जिवंत व्हावे या उद्देशाने उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Traditional Sports) स्पर्धा तसेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम जीवन चरित्र या विषयावर चित्रकला, निबंध व कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका (Municipal Corporation) शिक्षण विभागाच्या वतीने या स्पर्धांचे तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या प्रसिध्दीसाठी अर्थात फ्लेक्स आणि बॅनर बनवण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाकुंभच्या प्रसिध्दीसाठी ६४ लाख रुपये आणि श्री राम जीवन चरित्रासाठी सुमारे ११ लाख  रुपये अशाप्रकारे  विविध करांसह ८९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. (Krida Mahakumbh:२०२३-२४)

तर खेळ महाकुंभ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, पंच आणि पाहुण्यांसाठी खाऊ पुरवण्यासाठी तब्बल  ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये २ बिस्कीट पुडे आणि ५०० लिटर पाण्याची बॉटल अशाप्रकारे खाऊचा किट देण्यात आला होता. या बॉक्स करता ४० रुपये मोजण्यात आले असून अशाप्रकारचे तब्बल दीड लाख बॉक्सचे वाटप  झाले आहे. तर जेवणाचे कंटेनर पॅकींग हे १५० रुपयांमध्ये देण्यात आले आहे. अशाप्रकारे ३ हजार पॅकींग कंटेनरचे वाटप करण्यात आले आहे.  त्यामुळे खाऊ आणि प्रसिध्दीवरच महापालिकेच्या (Municipal Corporation) शिक्षण विभागाने सुमारे दीड कोटींचा खर्च केला असून अन्य खर्चाचेही हिशोब सादर केले जात आहे. त्यामुळे स्पर्धेसह कार्यक्रमांसाठी अन्य खर्चही केला गेला आहे. त्यामुळे हा खर्च आणखी काही कोटींच्या घरात आहे. महाराष्ट्र शासन आणि क्रिडा भारती (Krida Bharti) यांच्यासह महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केलेले असताना यासाठीचा सर्व खर्च महापालिकेच्या माथी मारण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासन आणि क्रिडा भारतीचे योगदान काय असाही सवाल उपस्थित केला जात आहे. (Krida Mahakumbh:२०२३-२४)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.