Manori Road : मनोरी गावातील रस्ते होणार टकाटक

मागील अनेक वर्षांपासून मनोरीतील रस्त्यांची झाली होती दुरवस्था

477
Manori Road : मनोरी गावातील रस्ते होणार टकाटक

मनोरी गावातील रस्त्यांची (Manori Road) मागील अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली असून विविध समस्यांमुळे या भागांमधील रस्त्यांची सुधारणा होण्यात अनेक अडचणी येत होत होत्या. त्यामुळे मनोरी भागांमधील ५ मुख्य वापराच्या रस्त्यांची सुधारणा सिमेंट काँक्रीटद्वारे करण्यात येणार असून ज्याठिकाणी सीआरझेड बांधित येणाऱ्या रस्त्यांचा विकास हा सिमेंट काँक्रीट ऐवजी डांबरीकरणाद्वारे केला जाणार आहे. (Manori Road)

मनोरी गावातील अनेक रस्त्यांचा (Manori Road) विकास न झाल्याने येथील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळेच गोराई गावात ग्लोबल पॅगोडाच्या उद्घाटनावेळी तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्याला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर येथील रस्त्यांची सुधारणा डांबरीकरणाद्वारे तातडीने करण्यात आली होती. परंतु तेव्हापासून या रस्त्यांचा विकास करण्यात आला नसून मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यांचा विकास न झाल्याने येथील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेला अखेर मुहूर्त सापडला आहे. (Manori Road)

मार्वे जेट्टी आणि नंतर गोराईपर्यंत ग्लोबल विपश्यना पॅगोडा तसेच मनोरी गावात मनोरंजन संकुल असल्याने दोन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द आहेत. त्यामुळे भारतासह जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे या परिसरातील स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक आदींकडून या रस्त्यांची सुधारणा करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे झाल्यानंतर तसेच याबाबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुढाकार घेत या रस्त्याची सुधारणा करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका रस्ते विभागाने मनोरीतील रस्त्यांचे (Manori Road) सिमेंट काँक्रीटीकरण तसेच डांबरीकरण करण्याची कामे हाती घेतली आहे. पाच रस्त्यांची सुधारणा महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे साठ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी प्रगती एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीने उणे २५ टक्के दर आकारत हे काम मिळवले. (Manori Road)

(हेही वाचा – Police Transfer Maharashtra : कार्यकाळ पूर्ण होऊन देखील जिल्ह्याबाहेर बदल्या नाही)

मालाड मनोरीतील या रस्त्यांची होणार सुधारणा

मनोरी गोराई मार्ग (मनोरी जेटीपासून बोरीवलीच्या सिमेपर्यंत)

मनोरी मार्ग (मनोरी जेटी रोड ते पाटील हाऊस)

ज्ञानसाधना शाळा मार्ग (मनोरी मुख्य रस्ता ते ज्ञानसाधना शाळा)

शाळा रोड ते व्हिला मार्ग

ओस्वाल्ड चर्च रोड (मनोरी मेन रोड ते ओस्वाल्ड चर्च रोड) (Manori Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.