Police Transfer Maharashtra : कार्यकाळ पूर्ण होऊन देखील जिल्ह्याबाहेर बदल्या नाही

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी

227
Thane: होळी आणि धुलिवंदनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना? जाणून घ्या...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांच्या (Police Transfer Maharashtra) करण्यात आलेल्या बदल्यामध्ये नाराजीचे सूर बाहेर पडू लागले आहे. नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या एपीआय आणि पीएसआयच्या जिल्हाअंतर्गत झालेल्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून देखील जिल्ह्याबाहेर बदली न करता जिल्ह्यातच बदली केल्यामुळे अधिकारी नाराज झाले आहे. (Police Transfer Maharashtra)

महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी होणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे पनिश्मेंट पोस्टिंग म्हणून ओळखली जात असली तरी प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या नोकरीच्या कार्यकाळात या जिल्ह्यात एक टर्म पूर्ण करावाच लागतो. राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांना एका जिल्ह्यात ६ वर्षांचा कार्यकाळ असला तरी गडचिरोली व इतर नक्षलवादी जिल्ह्यात केवळ अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली करण्यात येते. त्याचबरोबर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या जिल्ह्यात बदल्या करण्यात येतात. सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Police Transfer Maharashtra)

(हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपाच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी निश्चित; पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार)

पत्र लिहून नाराजी केली व्यक्त 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पोलीस दलात बदल्यांचे वारे सुरू आहे, या बदल्यांमध्ये काही जिल्ह्यातील बदल्या वादग्रस्त ठरल्या असून काही पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी मॅट (MAT) मध्ये धाव घेतली होती, त्यात अनेकांना न्याय देखील मिळाला. मात्र अद्याप ही पोलीस दलातील ही नाराजी दूर झालेली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा या जिल्ह्यातील कार्यकाळ उलटून देखील त्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या (Police Transfer Maharashtra) न करता जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे पत्र आणि महाराष्ट्र शासन, गृहविभाग शासन निर्णय पत्राचा संदर्भ देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Police Transfer Maharashtra)

या पत्रात निवडणुक आयोगाच्या नियमाचा संदर्भ देऊन भारतीय निवडणुक आयोग यांनी लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना/निर्देशानुसार बदलीस पात्र असतानाही, पोलीस अधिकाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात बदली न करता, त्याच जिल्ह्यातच फक्त दुसऱ्या उपविभागात बदल्या (Police Transfer Maharashtra) करण्यात आलेल्या असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच सपोनि हे पद पोनि प्रमाणेच राजपत्रित दर्जाचे पद असून पोनि दर्जाचे अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये तक्रार केल्याने त्यांच्या बदल्या केल्यात. परंतु सपोनि-पोउनि दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात बदली न करता, त्याच जिल्ह्यातच दुसऱ्या विभागात ठेवून भारतीय निवडणुक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केला असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आलेला आहे. तसेच मागील दोन दिवसात नाशिक, कोल्हापूर व संभाजीनगर परिक्षेत्राचे आयजी यांनी त्यांच्या खालील कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोनि-सपोनि-पोउनि यांच्या दुसऱ्या जिल्ह्यात बदल्या केलेल्या आहे. परंतु गडचिरोली परीक्षेत्रात नक्सलच्या नावावर निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे पत्रात म्हटले आहे. (Police Transfer Maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.