Kokan Railway : मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत

128
Kokan Railway : मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत

काल म्हणजेच शनिवार ३० सप्टेंबर रोजी पनवेल कळंबोली दरम्यान एक मालगाडी (Kokan Railway) घसरली. त्याचा परिणाम कोकण रेल्वेवर झाला असून कोकण रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या रायगड मधल्या सोमाटणे जवळ खोळंबल्या आहेत. त्यामुळे रेल्वे रुळावरूनच प्रवाशांनी पनवेलच्या दिशेने पायपीट सुरु केली आहे.

नवी मुंबई- पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडी घसरल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कोकणात (Kokan Railway) जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईत येणाऱ्या सर्व सर्व रेल्वे खोळंबल्या आहेत. अजूनही कोकण रेल्वे सुरळीत सुरु झालेली नाही.

(हेही वाचा – Health Tips : फक्त एक गुळाचा खडा खा, आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर)

अधिक माहितीनुसार, कालची म्हणजेच शनिवार ३० सप्टेंबर रोजी कोकणकन्या (Kokan Railway) एक्स्प्रेस तब्बल १० तास उशिराने धावली. तसंच मुंबई ते सावंतवाडी विशेष ट्रेन देखील १२ तास पुढे ढकलण्यात आली आहे. तुतारी आणि मंगलुरू एक्स्प्रेस (Kokan Railway) दिवा आणि निळजे दरम्यान अडकून पडल्या आहेत.

मुंबईहून कोकणात (Kokan Railway) जाणारे सर्व प्रवासी रात्रभर स्थानकांवर ताटकळत बसले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.