Birth Certificate: जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार, १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू; वाचा सविस्तर

या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे जन्मदाखला मिळणे सोपे होणार

235
Birth Certificate: जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार, १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू; वाचा सविस्तर
Birth Certificate: जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार, १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू; वाचा सविस्तर

जन्म प्रमाणपत्राबाबत (Birth Certificate) देशभरात १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होणार आहे. जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार आहे. नवीन नियमाअंतर्गत (new rules) फक्त जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)द्वारे शाळेत प्रवेश घेणे, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) बनवणे, मतदार ओळखपत्र तयार करणे (Voter ID Card), विवाह नोंदणी करणे (Marriage Registration Certificate) , सरकारी रोजगार नोंदणी (Government Employment Registration), पासपोर्ट (Passport) आणि आधारकार्ड (Aadhar Card) तयार करणे यासारख्या विविध कामांसाठी एकमेव जन्म प्रमाणपत्र लागणार आहे.

जन्म आणि मृत्यू नोंदणी (संशोधन) बिल २०२३ (Registration of Births and Deaths (Research) Bill 2023) हे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon sessions) संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले आहे. याला राष्ट्रपतींकडूनही मंजुरी मिळाली आहे. या नवीन कायद्याला १ ऑक्टोबरपासून देशभरात लागू करण्यात येणार आहे. नवीन कायदा नोंदणी जन्म-मृत्यूचे राष्ट्रीय आणि राज्यनिहाय स्तरावर डेटा तयार करण्यास मदत मिळू शकते. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे जन्मदाखला मिळणे सोपे होणार आहे.

(हेही वाचा – Nala Wall Collapse : अंधेरी पश्चिम ते दहिसर पर्यंतच्या सर्व नाल्यांच्या भिंतींची डागडुजी, होणार एवढा खर्च)

जन्म प्रमाणपत्राची इतर क्षेत्रासाठी मदत कशी होईल?
जन्म प्रमाणपत्रात बाळाचे नाव त्याच्या पालकांसह नोंदवले जाते. जन्म प्रमाणपत्रात बाळाचा जन्म दिनांक, ठिकाण आणि लिंग यासह इतर अनेक कायदेशीर माहिती असते. हा दस्तऐवज मुलाची ओळख म्हणून काम करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

जन्म प्रमाणपत्र हरवल्यास काय कराल ?
जन्म प्रमाणपत्र हरवले असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. अगदी सहजपणे नवीन जन्म प्रमाणपत्र मिळवता येते. यासाठी तुमच्या जन्माची नोंद ज्या स्थानिक रुग्णालयात करण्यात आली होती. तेथे जाऊन अर्ज भरा आणि त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यासारख्या ओळखीच्या पुराव्याची प्रत उदा. वीज बिल, टेलिफोन बिल किंवा बँक स्टेटमेंट (electricity bill, Telephone bill or bank statement) जोडा. दोन साक्षीदारांची स्वाक्षरी केलेला अर्ज द्या. अर्ज केल्यानंतर नवीन जन्म प्रमाणपत्र देण्यात येते. ही प्रक्रिया सहसा काही आठवडे किंवा महिन्याभरात पूर्ण होते. जन्म प्रमाणपत्राच्या प्रती स्कॅन करून ऑनलाईन सेव्ह करून ठेवा.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.