Kokan Railway : हुश्श! कोकण रेल्वे वाहतूक झाली सुरळीत

92
Kokan Railway : हुश्श! कोकण रेल्वे वाहतूक झाली सुरळीत

पनवेलजवळ मालगाडीला झालेल्या अपघातामुळे ठप्प झालेली कोकण रेल्वेची (Kokan Railway) वाहतूक तब्बल २८ तासांनी वाहतूक सुरू झाली आहे. काल, रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही वाहतूक सुरू झाली.

अपघातामुळे शनिवारी ३० सप्टेंबर रात्रीपासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. विविध ठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या गाड्यांमधील (Kokan Railway) प्रवासी विविध स्थानकांवर थांबलेल्या गाड्यांमध्येच अडकून पडले. रविवारी सायंकाळी उशिराने रेल्वेची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर मडगावपासून पनवेलच्या आधीच्या स्थानकापर्यंत रांगेने उभ्या असलेल्या गाड्या मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.

(हेही वाचा – Konkan Cyclone : कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज)

मालगाडीच्या अपघातानंतर रेल्वेच्या विविध झोनच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. यामध्ये विशेष करून कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेच्या गाड्यांचा समावेश आहे. अपघातानंतर कोकण रेल्वेने (Kokan Railway) आपल्या काही गाड्या रद्द केल्या, तर काही पुणे मिरज लोंढा मार्गे वळवल्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी कोकण रेल्वेने रविवारच्या रात्री अजून तीन एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या. त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ विशेष गाडी तसेच 12134 मंगळुरू मुंबई सीएसटी सुपरफास्ट एक्स्प्रेसचा समावेश आहे.

मध्य तसेच कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक आता पूर्वपदावर येत असली तरी अपघातानंतरच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा विलंब कायम आहे. मुंबईतून मडगावला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस (Kokan Railway) सोमवारी सुमारे पावणेआठ तास उशिराने धावत होती. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस मात्र आज वेळेत धावत आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस गाडी आज अर्धा तास (Kokan Railway) उशिराने धावत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.