Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा आता भारताच्या अस्मितेला हात; ‘या’ धमकीनंतर वाढवली सुरक्षा

248
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा आता भारताच्या अस्मितेला हात; 'या' धमकीनंतर वाढवली सुरक्षा
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा आता भारताच्या अस्मितेला हात; 'या' धमकीनंतर वाढवली सुरक्षा

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने पुन्हा एकदा भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या वेळी त्याने थेट संसद भवनावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

एक व्हिडिओ प्रसारित करून त्याने म्हटले आहे की, मला मारण्याचा कट फसला आहे, आता 13 डिसेंबरला किंवा त्यापूर्वी भारतीय संसदेचा पाया डळमळीत होईल. (Attack on Parliament) त्याने 13 डिसेंबरचा उल्लेख यासाठी केला कारण या तारखेला 2001 मध्ये संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : अधिवेशन काळातही याचिकेवर सुनावणी घेणार – राहुल नार्वेकर)

13 डिसेंबरच्या हल्ल्याची करून दिली आठवण

या व्हिडिओमध्ये एका बाजूला खलिस्तानचा झेंडा (Khalistani Terrorism) आणि दुसऱ्या बाजूला संसद हल्ल्यातील दोषी महंमद अफजलचे (Muhammad Afzal) पोस्टर आहे. ज्यावर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ (Khalistan) असे लिहिले होते.

 “भारतीय एजन्सींनी मला मारण्याचा कट रचला आणि तो अयशस्वी झाला. आता 13 डिसेंबर किंवा त्यापूर्वी संसदेवर हल्ला करून याचे प्रत्युत्तर दिले जाईल”, असे या व्हिडिओत म्हटले आहे. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

(हेही वाचा – Kerala High Court : १४ वर्षांची मुलगी ९ महिन्यांची गरोदर; गर्भपाताविषयी काय म्हणाले केरळ उच्च न्यायालय…)

अमेरिकेने केले भारतावर आरोप

नुकतेच अमेरिकन गुप्तचर संस्थांनी निखिल गुप्ता नावाच्या व्यक्तीला अटक केली. गुरपतवंत सिंगच्या हत्येचा कट भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यावरून रचला गेला. निखिल गुप्ता या एजन्सींच्या सांगण्यावरून काम करत होता, असा अमेरिकेचा दावा आहे.

भारताने हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. गुरुपतवंत सिंगकडे (Gurpatwant Singh Pannu) कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. येथून तो व्हिडिओ बनवून भारताला वारंवार धमकावत असतो. (Attack on Parliament) यापूर्वीही त्याने अनेक वेळा धमक्या दिल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.