Kerala High Court : १४ वर्षांची मुलगी ९ महिन्यांची गरोदर; गर्भपाताविषयी काय म्हणाले केरळ उच्च न्यायालय…

केरळ उच्च न्यायालयाने बाल संरक्षण अधिकाऱ्याला मुलीची गर्भधारणा आणि प्रसूती सुरू ठेवण्यासाठी तिला सर्व प्रकारची मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

266
Kerala High Court : १४ वर्षांची मुलगी ९ महिन्यांची गरोदर; गर्भपाताविषयी काय म्हणाले केरळ उच्च न्यायालय...
Kerala High Court : १४ वर्षांची मुलगी ९ महिन्यांची गरोदर; गर्भपाताविषयी काय म्हणाले केरळ उच्च न्यायालय...

केरळ उच्च न्यायालयाने १४ वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्याची परवानगी नाकारली. (no permission to abortion) मुलीच्या आईने केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) गर्भपाताची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. महिलेने आपल्या मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याचे सांगितले होते. त्यावर न्यायालयाने हा निवाडा दिला आहे.

न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने मुलीच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. आरोपी पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Acts) तुरुंगात आहे. केरळ उच्च न्यायालयाने बाल संरक्षण अधिकाऱ्याला मुलीची गर्भधारणा आणि प्रसूती सुरू ठेवण्यासाठी तिला सर्व प्रकारची मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – Terrorist Kill : बीएसएफ तळावरील मास्टरमाईंड दहशतवाद्याचा कराचीमध्ये खात्मा)

बाळ या जगात येण्यासाठी तयार आहे 

या वेळी न्यायालय म्हणाले की, मुलगी गरोदरपणाच्या 30व्या आठवड्यात आहे. ती सुमारे नऊ महिन्यांची गरोदर आहे. गर्भातील बाळाचे वजनही सातत्याने वाढत आहे. बाळाच्या शरीरातील मेंदू आणि फुफ्फुस यांसारखे महत्त्वाचे अवयव पूर्णपणे विकसित झालेले असतात. ते या जगात येण्यास तयार आहे. त्यामुळे आम्ही गर्भपाताला (no permission to abortion) परवानगी देऊ शकत नाही.

मुलीच्या आरोग्याला धोका नाही

न्यायमूर्ती देवन रामचंद्रन म्हणाले की, गर्भधारणेमुळे मुलीच्या आरोग्याला कोणताही धोका नाही. मूलदेखील पूर्णपणे ठीक आहे. मात्र, न्यायालयाला मुलगी आणि तिच्या कुटुंबाप्रति पूर्ण सहानुभूती आहे. कारण, मुलगी खूप लहान आहे.

(हेही वाचा – Novak Djokovic No 1 : वर्षअखेर नोवाक जोकोविचच नंबर वन)

मुलीवर जबरदस्ती नाही; मात्र कायद्याप्रमाणे बलात्कार

मात्र, मुलीवर कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नसल्याचे तपास अहवालात म्हटले आहे. मुलगी 13-14 वर्षांची असल्याने कायदेशीररित्या तो बलात्कार मानला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

डॉक्टर म्हणाले- सी सेक्शन प्रसूती होईल

गर्भधारणेच्या 30 व्या आठवड्यात गर्भाच्या हृदयाची गती चांगली असल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. मूल पूर्णपणे निरोगी आहे. त्यामुळे या टप्प्यावर गर्भपात शक्य नाही. मात्र, सिझेरियनद्वारेच प्रसूती (caesarean section) होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. (Kerala High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.