कल्याण : प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने(KDMC)बांधकाम आणि पाडकामादरम्यान निर्माण होणारा राडारोडा उघड्यावर टाकणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी गृहनिर्माण संस्था वा बिल्डर उघड्यावर राडारोडा टाकेल त्याच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.(KDMC)
बांधकाम कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार कोणत्याही नवीन बांधकाम, दुरुस्ती किंवा पाडकाम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला waste generator म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार निर्माण होणारा कचरा उघड्यावर न टाकता तो नियमानुसार सुरक्षितपणे गोळा करून अधिकृत केंद्रापर्यंत पोहोचवणे बंधनकारक आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी येणारा खर्च आणि व्यवस्थापन देखील संबंधितांनीच करणे आवश्यक आहे. या नियमाचा मुख्य उद्देश कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे हा आहे.(KDMC)
(हेही वाचा – Gen Z Banner : आंदोलनानंतर मुंबईत अचानक झळकले ‘हे’ बॅनर; एका संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधले )
त्यामुळे एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या आवारात नवीन बांधकाम, दुरुस्ती किंवा पाडकाम सुरू असल्यास त्याची माहिती संबंधितांनी तातडीने आपल्या प्रभागातील स्वच्छता अधिकारी किंवा स्वच्छता निरीक्षक यांना द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. यामुळे महापालिकेमार्फत त्यांना कचरा व्यवस्थापनाबत योग्य मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे.(KDMC)
मात्र महापालिकेला याबाबत कोणतीही माहिती न देता जर गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांमार्फत बांधकामादरम्यान निर्माण होणारा कचरा रस्त्यावर, मोकळ्या जागेत किंवा उघड्यावर टाकल्याचे आढळून आले तर संबंधित सदस्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.(KDMC)
या संदर्भातील परिपत्रक सर्व गृहनिर्माण संस्थांना पाठविण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली. त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी देखील परिसरात कुठे बांधकाम कचरा बेकायदेशीररित्या टाकला जात असल्याचे दिसल्यास त्याची तक्रार तातडीने महापालिकेकडे नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.(KDMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

