Gen Z Banner : आंदोलनानंतर मुंबईत अचानक झळकले ‘हे’ बॅनर; एका संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधले

Gen Z Banner : आंदोलनानंतर मुंबईत अचानक झळकले 'हे' बॅनर; एका संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधले

135
Gen Z Banner : आंदोलनानंतर मुंबईत अचानक झळकले 'हे' बॅनर; एका संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधले
Gen Z Banner : आंदोलनानंतर मुंबईत अचानक झळकले 'हे' बॅनर; एका संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधले
प्रतिनिधी

युवकांच्या आंदोलनानंतर मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) एका वेगळ्याच प्रकारची बॅनरबाजी पाहायला मिळत असून, या बॅनर्सची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या या बॅनर्समधून विद्यार्थ्यांना पाठिंबा देतानाच भारत सरकारबद्दल आदर व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या मोहिमेकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

मुंबईतील विविध प्रमुख रस्ते, चौक आणि गर्दीच्या परिसरात झळकलेल्या या बॅनर्सवर, “मी जेन झी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे”, “मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, मी भारत सरकारचा सन्मान करतो” आणि “शिक्षणाचा मान… भारत सरकारचा सन्मान” असे संदेश ठळकपणे लिहिण्यात आले आहेत. यासोबतच “राष्ट्र प्रथम” हा नारा देखील बॅनर्सवर देण्यात आल्याने त्यांची अधिक चर्चा सुरू झाली आहे.

(हेही वाचा – पेट्रोल पंपावर जाताय? आधी इन्शुरन्स तपासा; Supreme Court च्या ‘या’ आदेशाने वाहनधारकांचे धाबे दणाणले )

या बॅनर्समधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे समर्थन करताना सरकारचा सन्मान राखण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघर्षाऐवजी संवाद आणि सकारात्मक भूमिका मांडण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, या बॅनर मोहिमेमागे स्वतःला ‘जेन झी’ म्हणून ओळखणाऱ्या युवकांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही या बॅनर्सचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आंदोलनाच्या वातावरणात समन्वय, शिक्षण आणि राष्ट्रहिताचा संदेश देणारी ही बॅनरबाजी सध्या मुंबईतील चर्चेचा विषय ठरली असून, आगामी काळात या मोहिमेला कोणते स्वरूप प्राप्त होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.