
-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या अमृतमहोत्सवी जन्मत्सोवानिमित्त कल्याणमध्ये जनमत संस्थेच्या पुढाकाराने आठवणींतले बाळासाहेब व आनंद दिघे हा कार्यक्रम येत्या रविवारी १० मे रोजी सकाळी होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु असून त्यानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Kalyan)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व कल्याण शहराचे एक वेगळे नाते आहे. शिवसेनाप्रमुख अनेक वर्षे कल्याण शहरात वास्तव्यास होते. जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार व समाजकार्यकर्ते एकत्र येणार आहेत. (Kalyan)
(हेही वाचा – Gautam Gambhir : गंभीरमुळे भारतीय ड्रेसिंग रुममध्ये दुफळी, माजी खेळाडूचा आरोप?)
रविवारी सकाळी ११ वाजता आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार्या या आगळ्यावेगळ्या स्मृतीसमारोहास कल्याण-डोंबिवलीच्या महापौर अॅड. हर्षाली चौधरी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष कुमार कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, हिंदू मंचचे दिनेश देशमुख, जनता सहकारी बँकेचे डॉ. चंद्रशेखर तांबडे व ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे हे मान्यवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. (Kalyan)
आठवणींतील बाळासाहेब या कार्यक्रमाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. जनमत या सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचे तेजस राजे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवलीकरांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन जनमत संस्थेने केले आहे. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
