Kalyan : हेल्पिंग हँडचा रायगडमध्ये सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

80
Helping Hand team distributes educational supplies in Raigad.
Kalyan : हेल्पिंग हँडचा रायगडमध्ये सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan          कल्याणमधील हेल्पिंग हँड १९ या सामाजिक संस्थेतर्फे रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन रविवारी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या संस्थेच्या टीमने तेथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करून मदतीचा हात देण्यात आला. (Kalyan)

(हेही वाचा – Petrol Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग; वाचा तुमच्या शहरातील नवे दर काय?)

वाढत्या महागाईच्या काळात गरजू कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागते, हे ओळखून हेल्पिंग हँड १९ टीमने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये आणि त्यांना अभ्यासासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ​ (Kalyan)

(हेही वाचा – NEET पुनर्परीक्षेपूर्वी सरकारची मोठी कारवाई; २२ जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर बंदी, जाणून घ्या कारण)

समाजाप्रती आपली बांधिलकी जपताना हेल्पिंग हँड १९ टीम सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. या उपक्रमाला रायगडमधील स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या आणि सहकार्य केलेल्या सर्व दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक, तसेच हितचिंतकांचे टीमच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. (Kalyan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.