आक्षेपार्ह पोस्टमुळे कागलमध्ये तणावाचं वातावरण; पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

124
आक्षेपार्ह पोस्टमुळे कागलमध्ये तणावाचं वातावरण; पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात
आक्षेपार्ह पोस्टमुळे कागलमध्ये तणावाचं वातावरण; पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

कोल्हापुरच्या कागलमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या कागलमधील तरुणाने रविवारी आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता. या स्टेटसची माहिती झपाट्याने कागल शहरात पसरली, तेव्हा हिंदूत्ववादी संघटनांनी मोर्चा काढून संबंधित तरुणाला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनीही ताबडतोब कारवाई करून संबंधित तरुणाला अटक केली. याच पार्श्वभूमीमुळे सोमवारी कागल शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारचा कागलमध्ये आठवडी बाजार असतो, त्यामुळे पोलिसांनी सतर्क होऊन शहरात बंदोबस्त केला आहे.

(हेही वाचा – Game Jihad: गेमद्वारे धर्मांतरण प्रकरणात मास्टर माईंड शाहनवाज खानला अलिबागमधून अटक)

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनी, ५जून काही तरुणांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर औरंगजेब आणि टिपू सुलतानचा फोटो ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आक्षेपार्ह स्टेटसच्याविरोधात देशप्रेमी संघटनांनी ७ जूनला कोल्हापूर बंदची हाक दिली. तसेच यावेळी आंदोलनही करण्यात आले. पण या आंदोलनाची रुपांतर काही वेळात हिंसेत झाले, त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात १९ जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले. दरम्यान याप्रकरणी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणाऱ्यांना ६ जणांचा अटक करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.