Game Jihad: गेमद्वारे धर्मांतरण प्रकरणात मास्टर माईंड शाहनवाज खानला अलिबागमधून अटक

199
Game Jihad: गेमद्वारे धर्मांतरण प्रकरणात मास्टर माईंड शाहनवाज खानला अलिबागमधून अटक
Game Jihad: गेमद्वारे धर्मांतरण प्रकरणात मास्टर माईंड शाहनवाज खानला अलिबागमधून अटक

गेमद्वारे धर्मांतरण प्रकरणात आरोपी शाहनवाज मकसूद खान (वय २३) आणि त्याच्या भावाला अलिबागमधून अटक करण्यात आली आहे. रविवारी, १२ जूनला अलिबागमधील ए.बी.कॉटेज मांडवी मोहल्ला येथून या दोघांना अटक करण्यात आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. गाझियाबादच्या पोलिसांना चकवा देत शाहनवाज फरार झाला होता, अखेर मुंब्रा पोलिसांनी ही कारवाई करत त्याला गजाआड केले आहे. गाझियाबादमधील कवीनगर पोलीस ठाण्यात धर्मांतर कायद्याच्या कलम ३,५ (१) अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शाहनवाजच्या भावाला सिमकार्ड देऊन मदत करणाऱ्या आणखी दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांनी आपल्या दोन्ही मुलं निर्दोष असल्याचे सांगितले आहे. मुजीबुर रहमान यांचा मुलगा तौसिफ याने शज्जू खानला सिमकार्ड दिले होते. शज्जूने हे सिमकार्ड शहानवाजला वापरण्यासाठी दिले होते. मुंब्रा पोलिसांनी मुजीबूर रहमान यांच्या कुटुंबातील दोन्ही मुलांना अटक करून मुंब्रा पोलीस ठाण्यात आणले.

(हेही वाचा – Love Jihad : सब अब्दुल वैसे ही हैं!)

‘मुलांऐवजी मला करा शिक्षा’

मुजीबुर रहमान शेख यांचा मोठा मुलगा तौसीफ मुजीबुर रहमान शेख आणि धाकटा मुलगा आर्यन शेख असल्याचे वडिलांनी सांगितले. वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलांनी हे सिमकार्ड फक्त शज्जूला दिले होते, शाहनवाजला नाही. माझ्या मुलांनी चूक केली असेल तर मला शिक्षा करा माझ्या मुलाला नाही.

नेमके प्रकरण काय?

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन जैन मुलाचे ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतर करण्याचे प्रकरण समोर आले आहे.आता या प्रकरणात अल्पवयीन व्यक्तींसोबतच्या अनेक लोकांचे चॅट्स समोर आले आहेत. अल्पवयीन व्यक्ती धर्मांतराच्या जाळ्यात अडकल्याचे चॅट्समधून स्पष्ट झाले आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांनी मशिदीच्या मौलवीला अटक केली आहे.तसेच मास्टर माईंड मुंबईचा रहिवासी बद्दो उर्फ ​​शाहनवाजला आता अटक करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.