JP Nadda : जे पी नड्डा आरती करत असताना साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग

78
JP Nadda : जे पी नड्डा आरती करत असताना साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग
JP Nadda : जे पी नड्डा आरती करत असताना साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सध्या पुणे येथील गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आहेत. (JP Nadda) या अंतर्गत साने गुरुजी तरुण मंडळाच्या मांडपात श्री गणेशाची आरती करत असतांना मंदिराच्या प्रतिकृतीला आग लागली. या मंडळाने यंदा उज्जैनच्या महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. आरती सुरु असतानाच कळसाला आग लागल्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. पाऊस सुरू झाल्यामुळे आग काही मिनिटांत विझली. आरतीच्या वेळी मंडपात १०० लोक उपस्थित होते. (JP Nadda)

(हेही वाचा – Film Award : दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराची घोषणा)

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान आग लागल्यानंतर परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि एक वाॅटर टँकर ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत देखाव्याचे नुकसान झाले; पण कुणीही जखमी झाले नाही. (JP Nadda)

भाजप शहराध्यक्षांचे मंडळ

साने गुरुजी तरुण मंडळ हे पुण्यातील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे मंडळ आहे. यंदा या मंडळाने उज्जैन येथील महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारला आहे. त्यानुसार आरती सुरु असतानाच अचानक संध्याकाळी हा आगीचा प्रकार घडला. पुढील गोंधळ टाळण्यासाठी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर पडावे लागले. (JP Nadda)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.