चित्रपटसृष्टीतील अत्यंत मनाचा आणि प्रतिष्ठेचा समजणारा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराची (Film Award) घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना जाहीर झाला आहे.
गेल्या वर्षी हाच पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना देण्यात आला होता. दादासाबेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार वहीदा रहमान यांना जाहीर करण्यात आला आहे. वहीदा रहमान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वहीदा रहमान यांनी डान्सर म्हणून ‘अलिबाबावम 40 थिरुदरगलम’ या तमिळ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. एक फूल चार काँटे, चाँदनी, दिल्ली 6, बीस साल बाद या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले.
(हेही वाचा Mantralay : मंत्रालयाच्या जाळीवर तरुणाने मारली उडी; कायमस्वरूपी शिक्षक भरतीसाठी केले आंदोलन)
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची (Film Award) घोषणा केली. अनुराग ठाकूर यांनी एक ट्वीच शेअर केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली. त्यामध्ये मंत्री ठाकूर म्हणाले, वहीदा रेहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मानाची भावना आहे. वहीदा रेहमान यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांची समीक्षकांनी प्रशंसा केली आहे. त्यापैकी प्यासा, कागज के फूल, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, खामोशी आणि इतर अनेक चित्रपट आहेत. 5 दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त, वहीदा जी यांनी समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे.”
Join Our WhatsApp Community