Joshimath : पुनर्निर्माणाला केंद्र सरकारची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोशीमठ रिकव्हरी योजना राबविली जाणार

92
Joshimath : पुनर्निर्माणाला केंद्र सरकारची मंजुरी

उत्तराखंडमधील जोशीमठच्या (Joshimath) पुनर्निर्माणाला गुरुवारी (३० नोव्हेंबर) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जोशीमठसाठी 1658.17 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सततच्या भूस्खलनामुळे जोशीमठ धोक्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या पुनर्रचना (Joshimath) कक्षाकडून 1079.96 कोटी रुपयांची केंद्रीय मदत दिली जाणार आहे. तर उत्तराखंड सरकार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 126.41 कोटी रुपये आणि मदतीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून 451.80 कोटी रुपये देईल. यामध्ये पुनर्वसनासाठी 91.82 कोटी रुपयांच्या भूसंपादनाचाही समावेश आहे.

(हेही वाचा – NASA : ‘हे’ वैज्ञानिक उपकरण मंगळावरील जीवसृष्टीचा छडा लावणार)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) मार्गदर्शनाखाली 3 वर्षांच्या कालावधीत (Joshimath) जोशीमठ रिकव्हरी योजना राबविली जाणार आहे. यानंतर जोशीमठ हे परिस्थिती स्थिरतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून उदयास येईल, असे एका निवेदनात म्हटले आहे.जोशीमठ हे भूस्खलनामुळे बाधित झाले असून केंद्र सरकारने राज्याला सर्व आवश्यक तांत्रिक व इतर आवश्यक मदत उपलब्ध करून दिल्याचे निवेदनात नमूद आहे. (Joshimath)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.